स्वर आले दुरुनी


दुरून जेंव्हा स्वर येतात,
तेंव्हा हलकेच कान जागे होतात
आणि, मरगळलेल्या  तना-मनाला
आनंदाचे त्राण देतात

दुरून जेव्हा स्वर येतात,
तेंव्हा मनात रिमझिम चालू होते.
शब्द्स्वरांनी भरलेली ओंजळ
चिंब चिंब ओली होते

दुरून जेव्हा स्वर येतात, 
तेंव्हा शब्दांचं आभाळ मोकळं होतं.
लय आणि तालाच्या सोबतीनं
प्रत्येकाचं मन भिजवून जातं

दुरून जेव्हा स्वर येतात, 
तेंव्हा मनाचं पाखरू होतं, आणि
स्वरनादाच्या लहरिंवरून
शब्दगंधात हरवून जातं

 -- सौ. स्नेहा घाटे

No comments:

Post a Comment