एवढीच विनंती माझ्या गुरुनाथा

तीच वहि, त्याच कविता, तेच शब्द जे झाले होते भग्न
तुमच्या नजरेखालून जाताच पुन्हा जागले शब्द अन् स्वप्न 

तुम्ही म्हणालात वा छान ! जरा वेगळेच लिहिलेले शब्द आहेत बघ रे बाबा तू सुद्धा! माझ्या शब्दांना कोण पावति देत अाहे

देते वचन तुम्हासी दृढ या आशीर्वादाला जपून ठेवीन
प्रत्येक भावनेला आता वहीत कायमचेच घर बांधून देईन 

बघा तर कसा तुम्ही माझ्या बाबांना आकाशी मोक्ष दिला 
तुमच्या त्या चार शब्दांमुळेच तो कायमचा मोकळा झाला

शब्द आणि भावनांचे जणू आज आकाशी स्वयंवर लागले
त्यांना निरोप देतांना एकदाच शेवटचे हे अश्रूंनी लिहिले 

शब्द आणि भावनांना माझ्या पुन्हा नको पोरके होणे देवा असो हात तुझा या माता एवढीच विनंती माझ्या गुरुनाथा 


स्वाती निरंजन


No comments:

Post a Comment