आज मुक्त केलं मी तुला...
प्रीतीच्या पाशाची जखडण का वाटते?
स्वछंदी उडण्याचीही ध्यास का लागते?
प्रेमाच्या पिंजऱ्यात अडकल्याचा भास,
जीव गुदमरतोय ह्याचा खूप होतो त्रास।
पंख तोडले हा आरोप-प्रत्यारोप करता,
नभात उंच भरारी मारू कशी ती? आता ?
देवाच्या दारी, उभा ठाकलो मी गाभारी,
एकच इच्छा सामोरी, मुक्ती मिळवण्यापरी।
प्रेमाच्या पाशातून, प्रीतीच्या बंधनातून,
सगळ्या आशा, आकांक्षा, अपेक्षांतून,
मुक्त करशील का मला...?
आता नाही ते पाश, ना कोणतेही बंधन,
उत्तुंग अवकाशात झेप घेण्यास उत्सुक मन,
आज मुक्त केलं मी तुला...
आज मुक्त केलं मी तुला...।
-- डॉ. नम्रता कुलकर्णी
No comments:
Post a Comment