आज पुन्हा....!


आज आंबेडकर दिनाच्या निमित्ताने काका तुमची पुन्हा एकदा आठवण झाली. खरं तर तुमची आठवण सारखीच येत असते, पण आज प्रकर्षाने जाणवली त्याचं कारणही तसंच होतं, आज कॉलेजमध्ये सहा डिसेंबरचा कार्यक्रम होता. मुख्य भाषण झालं एस. सि. च्या प्राध्यापकांचं. माझा आपला छोटासा अध्यक्षीय समारोप. समारोपानंतर आम्ही सर्वजण स्टाफरूममध्ये आलो. तेव्हा माझे सहकारी मला म्हणाले मॅडम तुम्ही किती छान बोलता, तुमचं बोलणं अगदी मनापासून आल्यासारखा वाटत. सुकाळे सरांच्या या प्रतिसादामुळे माझं मन एकदम भूतकाळात गेलं.   

मी बीएडला असतानाचा प्रसंग! मला वादविवाद स्पर्धेत प्रथम बक्षीस मिळालं होत.  तेव्हा तुम्ही म्हणाला तुला शिक्षक व्हायचं आहे नामग तुला चांगलं बोलता आलंच पाहिजे. तेव्हा तुमच्या वाक्याने मी थोडी नाराज झाले. पण आज त्याचा अर्थ नव्याने जाणवला, आणि लक्षात आलं तुम्ही किती मोलाचं देणं दिलं आहे. आम्ही लहान असताना आम्हा भावंडांचं वाचन वाढावं जगातील घडामोडींचा ज्ञान व्हावं त्यावर बोलता यावं म्हणून तुम्ही सतत वाचा व त्यावर भाष्य करावा असा आग्रह धरायचात.

सर्व गोष्टींचं ज्ञान व्हावं म्हणून औरंगाबादला होणाऱ्या जवळजवळ सर्वच व्याख्यानांना घेऊन जायचात. अशी किती भाषणं ऐकली आपण. . . अगदी कळत नव्हतं तेव्हाही नेहरूंच्या भाषणाला गेलेलं अजून आठवतंय. नेहरू, अटलजी, जॉर्ज फर्नांडिस, दुर्गा भागवत, काळदाते ,पू ल अशी किती नावं घ्यावी. स्वामी चिन्मयानंदजी गीतेवर ची प्रवचन, बाबासाहेब पुरंदरेंची शिवाजी महाराजांवर व्याख्यानमाला, केळकरांचे रामायण, शिवाजीराव भोसल्यांचे वक्तृत्व अशी यादी किती लांबवावी? तुमच्या आवडत्या ओळी होत्या-

केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार 

शास्त्र ग्रंथ विलोकिता मनुजा चातुर्य येतसे फार 
अभि त्यांनी व्हावा म्हणून तुमची तुम्ही आमच्याबरोबर भाषणांना तर यायचात.  पण भाषणच काय कितीतरी दर्जेदार चित्रपट आपण एकत्र पाहिले आहेत. इंग्रजी हिंदी मराठी, राजकमलचे प्रभातचे चित्रपट, नाटकंकथाकथनाचे कार्यक्रम या सर्वांचा किती आनंद घेतला अापण! हा आनंद घेताना हे संस्कार आहेत हे त्यावेळेला कळले सुद्धा नाही.

आज कळत. जेव्हा लोकांना आमचं वेगळेपण जाणवतं तेव्हा लक्षात येतं किती वेगळे आणि चांगले संस्कार केलेत तुम्ही आमच्यावर! तुमचं पाठांतर सुद्धा किती होतं कितीतरी छान छान कविता तुम्ही सतत म्हणायचातवेगवेगळे संस्कृत इंग्रजी मराठी  नाटय़ उतारे म्हणून दाखवायचातयातूनच अभिजात उत्तम साहित्याची आवड रुजली आम्हा सर्वांच्या मनात. आयुष्य समरसून जगायचाागोष्टींचा मनापासून आनंद घ्यायचा हे तुम्ही मला शिकवलत. तुमच्या गोष्टी कविता वाचन यामुळे आमची व्यक्तिमत्व किती संपन्न झाली आहेत हे सांगता यायचं नाही शब्दात. आज खूप श्रीमंत असल्यासारखा वाटताय. काका, तुम्ही तर सतत सोबत आहातच पण तुम्ही दिलेले संस्कार आहेत. केवढा मोठा वारसा दिला तुम्ही आणि विशेष म्हणजे यात वाटेकरी नाही ही सगळं माझं एकटीचं अाहेस्त्रीधन!
खंत एवढीच वाटते, तुम्ही दिलेला वारसा पुढे माझ्या मुलांपर्यंत पोहोचवण्यात मी कमी पडतेय की काय?

                        सौ श्रद्धा जीवन कुलकर्णी 

No comments:

Post a Comment