मकर संक्रांत...

मकर संक्रांतीला, 'तिळगुळ घ्या गोड गोड बोला' ह्या पलीकडे काही शास्त्रीय, भौगोलिक, धार्मिक, पौराणिक वगैरेही कारणं असतात, हे सांगणं हेच ही कविता लिहिण्यामागचं कारण...


भ्रमणांती तारांगणात, नक्षत्रांच्या विश्वात,
श्री सूर्य नारायणाने प्रवेश केला मकरात।

दक्षिणायनातून गमन करतो उत्तरायणात,
संगे शिशिर वसन्त ऋतूही चालूनी येतात।

भ्रमर घाले पिंगा, फुलाभोवती रानावनात,
गारवा लोपून जरा, आला पौष दिमाखात।

संकारसुराने मांडले होते तांडव जनमनात,
संक्रांती देवीने नयनाट केला एका क्षणात।

म्हणती कधी पोंगल, लोहरी, बीहू, संक्रांत,
साजरा करती उडवूनी पतंग अवकाशात।

हळदीकुंकवाचे सोहळे सजले घराघरात,
गोड बोलून सगळ्यांना तिळगुळ द्याच हातात।

जुने समृद्ध होवूनी, नवे स्नेहसंबंध जुळतात,
गुळासंगे स्नेहभाव तिळा-तिळाने वाढतात।

-- डॅा. नम्रता कुलकर्णी

No comments:

Post a Comment