मनात येतात राहून राहून
महाभारतातील, काही रहस्य
महाभारतातील, काही रहस्य
दुर्वासांच्या श्लोकात, कोणते गूढ सामर्थ्य?
करिता मंत्रोच्चार कुंतीने, सूर्यदेव झाले प्रसन्न
अन् जन्मास आला, तेजस्वी पुत्र कर्ण
मनात येतात राहून राहून...
दुर्योधनाने कणकनीतीने , रचिली एक नामी युक्ती
पांडवाचा नाश करायास, लढविली कुटील बुद्धी बांधूनिया लक्षागृह,
पाठविले तयांना वारणावत वनी
परि, पांडव निघाले कुशलक्षेम, जळत्या लक्षागृही
मनात येतात राहून राहून...
पांडवाचा नाश करायास, लढविली कुटील बुद्धी बांधूनिया लक्षागृह,
पाठविले तयांना वारणावत वनी
परि, पांडव निघाले कुशलक्षेम, जळत्या लक्षागृही
मनात येतात राहून राहून...
होते जरी पितामह, राज-सभेत हजर
दुःशासनाने मांडिले, पांचालीचे वस्त्रहरण
का हतबल पितामह, पाहूनी त्या दुष्कृत्यास
कैसे पुरविले वस्त्र सख्याने, तिच्या लज्जा-रक्षणास
मनात येतात राहून राहून...
एकच तुळशीपत्र, सेवन करिता माधवाने
शिष्यांसह दुर्वास मुनी, परतले समाधानाने
न भक्षिता अन्न कण, झाले तृप्त? भोजनाने
काय गूढ होते असे, द्रौपदीच्या थाळीमधे
शिष्यांसह दुर्वास मुनी, परतले समाधानाने
न भक्षिता अन्न कण, झाले तृप्त? भोजनाने
काय गूढ होते असे, द्रौपदीच्या थाळीमधे
मनात येतात राहून राहून
महाभारतातील काही रहस्य
-- वैशाली वर्तक
No comments:
Post a Comment