'गृहीत धरून जगताना... !'

आपल्या दुःखाचे मूळ काय ह्याचा विचार केला असता बरेचदा आपल्या हे लक्षात येते की आपण प्रसंगांना, माणसांना गृहीत धरतो. आपण गृहीत धरल्याप्रमाणे झाले तर आपण आनंदी आणि नाही तर दुःखी असे आपल्याला लक्षात येते.
We take everything for granted, everything includes even relation with close relatives.

'गृहीत धरून जगताना... !' ह्या लेखात पूज्य पेठेकाका सांगतात की आपल्याला जगताना गृहीत धरण्याची गरज आणि त्याच्या मर्यादा याची जर सतत सावध जाणीव असेल तरच आपण स्वस्थ जगू शकू. 'गृहीत धरून जगताना... !' ह्याबद्दल अधिक जाणून घेऊया त्यांच्या लेखातून ....




पेठे काकांबद्दल 



डॉ. सुहास पेठे काका हे साताऱ्यातील आधुनिक दार्शनिक संत म्हणून ओळखले जातात. श्री ज्ञानेश्वर माऊलींपासून ते श्री जे. कृष्णमूर्ती यांच्यापर्यंत सर्व पंथांच्या उपासनेचे सार स्वतः आचरून सर्वसामान्य साधकांना सोप्या भाषेत सांगण्याचे असामान्य काम पेठे काकांचे आहे. प्रपंचात राहून परमार्थ कसा करायचा याचे उत्तम उदाहरण म्हणजे पेठेकाका. चोवीस वर्षे स्टेट बँकेत नोकरी करून २००१ मध्ये काकांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन उपासना व्यापक प्रमाणात चालू केली.
 त्यांचे वेगवेगळे उपक्रम जसे मौनमाळनामशिबिरेप्रश्नोत्तरसत्रेपदयात्राहरिजागरआत्मपरीक्षण शिबिरेमुलांची शिबिरेचिंतनसत्रचर्चा भेटी हे गेले अनेक वर्षे चालू आहेत. त्यांच्या जवळ जवळ १०० च्या वर पुस्तकांचे तसेच १२५ च्या वर व्हिडीओ सीडींचे प्रकाशन झाले आहे.


No comments:

Post a Comment