परीक्षेपूर्वी अभ्यास करावा हा आदर्श दृष्टीकोन आहे, याबद्दल दुमत नाही. पण परीक्षेनंतरचा अभ्यास हा नुसता विचार नाही तर आपल्याला आयुष्यात अनेक ठिकाणी उपयोगी पडणारा एक परिपक़्व दृष्टीकोन आहे. कारण काम कोणतेही असो ते अधिकाधिक परिपूर्ण असावे, चांगले असावे, आदर्श असावे हा दृष्टीकोन सर्वत्र विधायक आहे. अनेक क्षेत्रात आपल्याला त्याचा प्रत्यय येईल. डॉ. सुहास पेठेकाकांनी अतिशय सोप्या भाषेत ह्याचा उहापोह केला आहे.
त्यांचा 'परीक्षेनंतरचा अभ्यास...! ' हा लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
डॉ. सुहास पेठे काका हे साताऱ्यातील आधुनिक दार्शनिक संत म्हणून ओळखले जातात. श्री ज्ञानेश्वर माऊलींपासून ते श्री जे. कृष्णमूर्ती यांच्यापर्यंत सर्व पंथांच्या उपासनेचे सार स्वतः आचरून सर्वसामान्य साधकांना सोप्या भाषेत सांगण्याचे असामान्य काम पेठे काकांचे आहे. प्रपंचात राहून परमार्थ कसा करायचा याचे उत्तम उदाहरण म्हणजे पेठेकाका. चोवीस वर्षे स्टेट बँकेत नोकरी करून २००१ मध्ये काकांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन उपासना व्यापक प्रमाणात चालू केली. त्यांचे वेगवेगळे उपक्रम जसे मौनमाळ, नाम शिबिरे, प्रश्नोत्तरसत्रे, पदयात्रा, हरिजागर, आत्मपरीक्षण शिबिरे, मुलांची शिबिरे, चिंतनसत्र, चर्चा भेटी हे गेले अनेक वर्षे चालू आहेत. त्यांच्या जवळ जवळ १०० च्या वर पुस्तकांचे तसेच १२५ च्या वर व्हिडीओ सीडींचे प्रकाशन झाले आहे.
त्यांचा 'परीक्षेनंतरचा अभ्यास...! ' हा लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
पेठे काकांबद्दल
No comments:
Post a Comment