चारोळ्या


(१)
तुझं माझं नातं आहे
र्हिदय अन रुधिरापरी
प्राणांशीच खेळ सारा
दिल्या घेतल्या श्वासातुनी

(२)
साखरेसारखी गोड तू 
मधाळ तुझे हास्य आहे
विरघळून असा गेलो पुरता
उरलो नाममात्र आहे

(३)
निळे पीस खुणविते गौरांगी
मिटले नयन तरी सावळीच रुंजी
स्मरून प्रीत मोरपिशी तयाची
भुलली राधा लुटली श्रीरंगी

(४)
सतत हुरहूर  सतत धडधड
जीव नुसता टांगणीला
तुझ्या नकळत तुला बघण्यास
मी चान्दासारखा भागलेला

                           
संगीता मुकुंद परांजपे



No comments:

Post a Comment