तेवढंही अवघड नाही...!

एखादी गोष्टं किंवा एखादा प्रसंग अवघड आहे असं वाटणं म्हणजे त्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी कमी तयार असणं किंवा अजिबात तयार नसणं. बऱ्याच गोष्टी सवयीच्या नसतात, अनपेक्षित असतात म्हणून त्या अवघड आहेत असे वाटते. पण अपरिचित असलेल्या सगळ्याच गोष्टीत अडचणी येतीलच असेही नाही. 

"तेवढंही अवघड नाही...!" ह्या लेखात पेठे काका सांगतात कि ज्यांना "हे तेवढं अवघड नाही" हे लक्षात येतं ते थोडा अवघडपणा सोसून पुढं सरळ, सोप्या आयुष्याकडे निघून जातात आणि यशस्वी होतात. 

लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

                                                            पेठे काकांबद्दल 

डॉ. सुहास पेठे काका हे साताऱ्यातील आधुनिक दार्शनिक संत म्हणून ओळखले जातात. श्री ज्ञानेश्वर माऊलींपासून ते श्री जे. कृष्णमूर्ती यांच्यापर्यंत सर्व पंथांच्या उपासनेचे सार स्वतः आचरून सर्वसामान्य साधकांना सोप्या भाषेत सांगण्याचे असामान्य काम पेठे काकांचे आहे. प्रपंचात राहून परमार्थ कसा करायचा याचे उत्तम उदाहरण म्हणजे पेठेकाका. चोवीस वर्षे स्टेट बँकेत नोकरी करून २००१ मध्ये काकांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन उपासना व्यापक प्रमाणात चालू केली. त्यांचे वेगवेगळे उपक्रम जसे मौनमाळनामशिबिरेप्रश्नोत्तरसत्रेपदयात्राहरिजागरआत्मपरीक्षण शिबिरेमुलांची शिबिरेचिंतनसत्रचर्चा भेटी हे गेले अनेक वर्षे चालू आहेत. त्यांच्या जवळ जवळ १०० च्या वर पुस्तकांचे तसेच १२५ च्या वर व्हिडीओ सीडींचे प्रकाशन झाले आहे.




No comments:

Post a Comment