सांज समयी या संध्येला


स्तिमित होते मन माझे 
तुझे बिंबही पाहता......

आठवणींच्या कल्लोळातही 
माझ्या गाण्यांचा हुंदका ......

गहिवरतात मग डोळे ओले 
पापणीत सागर सामावूनही ....

खोल जाताना मनाचा सूर्यही 
आत आत मला साठवूनही ........

प्राक्तनांचे मी अर्घ्य दिधले 
सांज समयी या संध्येला .....

नकळत बोलून गेले अन् तिजला 
भेट घडव गं माझ्या स्वप्नांची मजला ......

- श्रद्धा विंचुरे

No comments:

Post a Comment