सदर- साडीबद्दल बरेच काही (भाग २) - पैठणी

पैठणी साडी तसे बघता सर्वांचीच्या परिचयाची. पैठणीचा उल्लेख होताच आपल्या डोळ्यासमोर मोर नाचू लागतात. मुख्यतः ही महाराष्ट्राची पारंपारिक साडी, जी आपल्याकडे असावी अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. मैत्रिणींनो, आज मलाही खूप आनंद होतो आहे, की मला माझ्या आवडत्या साडीबद्दल चार शब्द लिहायला मिळत आहे. ह्या लेखाचे पूर्ण श्रेय मी जगातील . पैठणी उत्पादक ह्यांना देते. आपल्या महाराष्ट्रासाठी पैठणी ही नुसतीच साडी नसून, एक संस्कृती आहे, एक परंपरा आहे. ही परंपरा जपण्यासाठी आपल्या सगळ्यांनाच हातभार लावावा लागणार आहे. त्या साठी माझा हा छोटासा प्रयत्न.

ह्या कलेबद्दल थोडी माहिती मिळवण्याचा प्रयत्नात मला बऱ्याच गोष्टी कळल्या ज्या पूर्वी माहित नव्हत्या. पैठणी घेताना काय बघून घ्यावे, कसे ओळखावे की ती हातमागावरील आहे की मशीनने बनवलेली आहे.

पैठणी पूर्णतः रेशीम वापरून हातमागावर तयार केली जाते आणि तिच्या पदरावरती विविध प्रकारच्या डिझाईन पूर्णपणे हातानी विणल्या जातात.

त्यांचे मुख्यतः 3 प्रकार आहेत
(पारंपारिक नारळीबॉर्डर
() मुनिया बॉर्डर
() ब्रोकेड

हातकामाच्या स्वरूपानुसार पैठणी तयार होणारा कालावधी साधारणतः १० दिवसांपासून वर्षापर्यंत असतो त्या नुसार त्याची किंमत ठरवली जाते. साधारणतः सहा हजारापासून ते दोन लाखापर्यंतच्या पैठण्या नियमित स्वरूपात वेगवेगळ्या रंगात तयार केल्या जातात.




पैठणीची निर्मिती ही पेशवे कालीन असल्यामुळे पूर्वी ती फक्त राजघराण्यामध्येच वापरली जायची किंबहुना फक्त त्यांच्यासाठीच तयार केली जात असे. परंतु आता तसे नाही. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील येवला हे पैठण्याचे माहेर, पैठणी तयार होण्याचे मुख्य ठिकाण. ज्यांचा पुरवठा मागणीनुसार पूर्ण भारत देशात अनिवासीय भारतीयांमध्ये जगभर केला जातो. पुणे आणि पैठण येथेही ह्या साड्यांचे उत्पादन केले  जाते.

येवला येथे दीर्घ इतिहास असलेले श्री.राजाभाऊ त्यांचे थोरले बंधू श्री.श्रीनिवास यांचे पैठणीच्या उत्पादनाचे भारतातील सर्वात मोठे दालन असून, हे दालन .. १८६० पासून कार्यरत आहे. जवळजवळ १५६ वर्षांची परंपरा असलेले हे दालन विदेशात सुद्धा पैठण्यांचा पुरवठा करतात. आज पर्यंत लंडन, सिंगापूर, दुबई या ठिकाणी प्रदर्शन आणि मराठी संमेलनात भाग घेऊन आपल्या भारतीय महिलांसाठी पैठण्यांची हौस पूर्ण करण्याचा आनंद दिला आहे.

                     Video visible on Laptop and PC



साधारणतः एका पैठणीची निर्मिती करताना एका हातमागासाठी किमान ते व्यक्तींचा सहभाग असतो असे साधारणतः ३००० हातमाग येवल्यात कार्यरत आहेत. शेतकरी कुटुंबात सुद्धा जोडधंदा म्हणून काही शेतकरी होतकरू मुलांनी पण ही कला अवगत केली आहे. पैठणीच्या माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष किमान १५००० लोकांना रोजगार उपलब्ध होतोपैठणीत असलेले हातकामाचे विणण्याचे ज्ञान/कला ही इतर साड्यांच्या पेठेत अवगत नसल्यामुळे फक्त जाणकार प्रशिक्षित विणकारच ही तयार करू शकतात.

आपल्या आवडीनुसार जर काही बदल हातकामात करून साडी बनविण्यासाठी कोणी इच्छुक असेल तर त्या प्रमाणे ते सहजरित्या शक्य होते, जे इतर कोणत्याही साड्यांच्या प्रकारा होत नाही. हे ह्या साडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे, म्हणून पैठणीला साड्यांची राणी म्हणून संबोधले जाते.


Video visible on Laptop and PC

थोडक्यात एखाद्या भगिनीला आपल्या पतीचा फोटो जरी पदरात विणून हवा असेल तर तो शक्य आहे. भारत व महाराष्ट्र सरकार तर्फे सुद्धा प्रत्येक वर्षी पैठणी विणणाऱ्या कारागिरांचा सन्मान केला जातो. हातकामाच्या पैठणीत पदरावर जी प्रतिमा विणली जाते, ती विरुद्ध बाजूने सुद्धा सारखीच दिसते. मशीनने तयार केलेल्या डिझाईन मध्ये धाग्यांचा गुच्छ असतो तेव्हा प्रतिमा दिसत नाही, हे प्रामुख्याने हातमागावर तयार केलेली पैठणी ओळखायचे एकमेव रहस्य होय.

पैठणीत प्रामुख्याने मोर ह्या डिझाईनचा विविध रूपात उपयोग केला जातो. मोर हा राजकीय पक्षी किंवा पक्ष्यांचा राजा म्हणून ही ओळखला जातो, ईश्वराने दिलेल्या विविध रंगानी नटलेला मोर परंपरेने पैठणीसाठी निवड केला गेला आहे. ह्या पक्ष्याला पूर्वी राजघराण्यातील एक शुभचिन्ह मानले जात असत.



पेशवेकाळात रेशीम आणि सोनंच वापरले जायचे पैठणी बनवण्यासाठी. पूर्वीपासूनच रेशीम मुख्यतः बंगलोर येथून जरी सुरत येथून आणली जात असे. पेशव्यांच्या काळात सोन्याची जरी वापरली जात असे जिचे रूपांतर कालांतराने चांदीच्या जरी झाले सध्या तयार होणाऱ्या पैठण्या ह्या तांब्याच्या तारांनी तयार केल्या जातात. तुम्ही तुमच्या आजीची पैठणी बघितली असेलच सोन्याची जर वापरलेली. अजूनही सोन्याने विणलेल्या पैठण्या तयार केल्या जातात. आपली गानकोकिळा लताताईंची सर्वात आवडती साडी म्हणजेच पैठणी.



जर कोणत्या ग्राहकांची पसंती चांदीच्या तारांची असेल तर त्या प्रमाणे ऑर्डर घेऊन तयार करून मिळते. अश्या ह्या विविध रूपांनी नटलेल्या पैठण्या वापरण्याचा मोह हा प्रत्येक स्त्रीला असतो.

हे सदर लिहिताना मला श्री.राजाभाऊंची खूप मदत मिळाली प्रत्यक्ष भेटण्याची संधीही मिळाली. खूप काही शिकायला मिळाले, ह्या साठी त्यांचे त्यांच्या थोरल्या बंधूंचे मनापासून आभार.

---- स्वाती ब्रम्हे

No comments:

Post a Comment