ती...
ती भावूक होते कधी...
कधी गहिवरतेही...
स्वप्नात हरवून जाताना
गाण्यात सापडतेही कधी...
ती...
ती मौनातही बोलते कधी
ती शब्दातही गुंतते कधी...
कवितेत कधी रमताना
ती भावनेत चिंब भिजते कधी...
ती...
ती अंगार धगधगता होते कधी...
ती मशाल ज्वाला होते कधी...
कधी शस्त्रांनी कधी अस्त्रांनी
कधी शब्दांनी प्रहार वार करते कधी...
ती...
ती भक्तिरसातही बुडते कधी...
ती हरिभजनातही रमते कधी...
कधी आरती कधी ओवी म्हणतानाही ब्रम्हानंदी स्मरते
कधी...
ती...
ती सर्व रूपात दिसतेही
ती सर्वाठायी वसते कधी...
हवेतही...पावसाच्या सरीतही...
आकाशातही...नदी सागरातही...
ती...
ती आहेच आपल्या रोमारोमात...
ती आहेच आपल्या प्रत्येकीत...
हिच्या, तिच्या अगदी सगळ्या जणींत...
"ती"ला आपणच थोडं जागं करू या...
" ती"च्या बरोबर आपण बहरू या...
श्रद्धा विंचुरे
No comments:
Post a Comment