नववर्ष आणि संकल्प

"कसले नववर्ष आणि सेलेब्रेशन्स घेऊन बसला आहात" कोकणचे काका पेपर वाचता वाचता एकदम बोलले.

"का? त्यात काय चूक आहे?" माझा भाऊ म्हणाला.

"
बरोबर काय आहे ते सांग. आपला नववर्ष चैत्रात, वित्तीय वर्ष एप्रिल पासून आणि शालेय वर्ष जून - जुलै पासून, मग जानेवारी आणि नववर्षाचा आपला काय संबंध ?"

"
अहो पण कॅलेन्डर बदलतं ना?"

"
कॅलेन्डर बदललं म्हणून उत्सव?"

"
का नको? समय कसा पळत चालला आहे ते कळण्यासाठी असले milestone हवे असतात"

"
मग वाढदिवस कशाला असतात?"

काका एकदम फॉर्म मध्ये आले होते. कोकणातले दूरचे काका तिथेच शिक्षक होते. वाचायचा भयंकर नाद. इंग्लिश, मराठी आणि हिंदी तिन्ही भाषेत भरपूर वाचन केले होते आणि काही वर्षांपासून त्यांना विकिपीडिया हि जंत्री सापडली होती. जे मिळेल त्यावर वाचत सुटायाचे, खोल खोल जात राहायचे. मी त्यांचं वक्तृत्व ऐकत होतो आणि रिंगणात प्रवेश घ्यावा कि नाही हा विचार करत होतो.

"
तू का गप्प?" त्यांनीच मला आव्हाहन दिले.


त्यांचे मत पटत असले तरी वाद चालू ठेवायचा असं ठरवून मी हि शेवटी वाद-विवाद  स्पर्धेत भाग घेतला

"
मला तुमचं काही अंशी पटतं आहे, पण तुम्हाला new year वर एवढी चीड का?"

"
मला लोकांच्या मूर्खपणा वर चीड येते"

"
नवीन वर्ष सुरु झालं त्यात काहीही विशेष नाही?"

"
नाही. फक्त चेक वर तारीख घालताना किंवा फॉर्म भरताना कुठलं वर्ष सुरु आहे हाबद्दल लक्ष ठेवावं लागतं. आता सगळं online झाल्या मुळे तेवढी हि गरज लागत नाही"

"
कोरिया मध्ये लोकांचं शासकीय वय नववर्षापासून मोजलं जातं. मुलगा जन्माला आला कि तो वर्षाचा असतो आणि नववर्षाच्या दिवशी सगळ्यांची वये वर्षानी वाढली असं समजलं जातं वाढदिवस कधी हि असला तरी. आता बोला"

"
म्हणजे कोरियाच्या लोकांनी काही तरी उपयोग करून घेतला नववर्षाचा. आपण काही उपयोग करता नुसतं नाचत आहोत"

"
पण मला तुमचा हा विरोध प्रतिगामी वाटतो. येशू ख्रिस्त २५ डिसेंबर ला जन्माला आला त्याचा सण दिवस साजरा करून जानेवारीला नववर्ष मानतात त्यात मला काहीहि चूक वाटत नाही. जर तुम्हाला हा सण साजरा ना करावा असं वाटतं असेल तर तुमचं म्हणणं प्रतिगामी आहे" मी काकांना अजून चिडवले.

"
आपल्या अकलेचं अजून प्रदर्शन करू नकोस. येशू ख्रिस्त २५ डिसेंबर ला जन्मला हे कोणी सांगितलं तुलायेशू ख्रिस्त एप्रिल मध्ये जन्मला. कुठल्या हि गोष्टीची नीट माहिती काढता जुनं जे चाललं आहे तेच बरोबर असं सांगणारे प्रतिगामी असतात. म्हणजे इथे खरा तर तूच प्रतिगामी आहेस."

"
मग लोकं वर्षाचा उत्सव का करतात आहे?"

"
उत्तर देण्यायोग्य हा पहिला प्रश्न विचारलास तूअरे "पीने वालों को पीने का बहाना चाहिये". रिसॉर्ट्स, हॉटेल्स, ग्रीटिंग कार्ड वाले आपला धंदा चालवायला असल्या गोष्टींचा उदोउदो करतात."

"बरं ते सोडा पण नववर्षाला लोकं संकल्प घेतात तेवढ्या पुरता तरी जानेवारीचा उपयोग आहे हि नाही?"

"
नववर्षाचा संकल्प हा तर मूर्खपणाचा कळस आहे. अरे जानेवारीला काहीही करण्यासारखे नसते म्हणून लोकांनी काही तरी लावून दिलं आहे.

"
म्हणजे?"

"
मला सांग वित्तीय वर्ष एप्रिल पासून लागतं पण कोणी "या वर्षी मी फालतू खर्च करणार नाही", "मी सगळे खर्च नीट लिहीत जाईन", "मी जास्त पैसे मिळवायचा प्रयत्न करीन" असले प्रण घेतं का ?. जूनला मुलं  "या वर्षी मी रोज कमीत कमी तास अभ्यास करीन", "मी मोबाईल वर गेम खेळणार नाही" असले संकल्प घेतात का? जानेवारीचा संकल्प म्हणजे फक्त चार लोकांना सांगण्यासाठी असतो पाळण्यासाठी नव्हे."

"
म्हणजे लोकांना काही चांगलं काही नवीन सुरु करायचं असलं आणि त्यांनी जानेवारीला त्याची सुरुवात केली तर त्याला तुमचा विरोध आहे "

"
काही तरी चांगलं आणि नवीन सुरु करणारा माणूस जर ते सुरु करायला जानेवारीची वाट बघत असला तर त्यातच तो आपल्या निश्चया विषयी किती प्रामाणिक आहे हे कळून येतं."

"
म्हणजे एखाद्या दारूबाज माणसाने ' जानेवारी पासून मी दारू सोडेन' असं ठरवलं तर त्यात चूक आहे?"

"
दारू पिणाऱ्यानी ज्या दिवशी दारू सोडली तोच दिवस त्याने नववर्ष म्हणून साजरा करायला हवा. जानेवारी पर्यंत थांबायची काही गरज आहे का?""

"
मान्य. पण आता असा हो किंवा नाही विचार करण्यापेक्षा थोडा मधला विचार करा"

"
म्हणजे ?" काका पहिल्यांदाच पहिल्यांदाच दुसऱ्याच ऐकायला तयार झाले होते.

"
म्हणजे दुसऱ्या दिवशी पासून दारू सोडणारा जानेवारी पर्यंतची वाट पाहणाऱ्या पेक्षा उजवा असेल. पण आपण एक  तिसरा माणूस घेतला जो दारू सोडतच नाही त्यापेक्षा तर जानेवारी पर्यंत वाट पाहून मग दारू सोडणार बरा आहे?"

"
पण ते टिकलं पाहिजे ना, नववर्षाच्या संकल्प नववर्षाच्या डायरी सारखा असतोफक्त पहिल्या - दिवसांची पर्यंतची पान भरलेली असतात. पुलंनी म्हटलंच आहे "कोणाचा गणपती दीड दिवसाचा तर कोणाचा दहा दिवसाचा" असाच हा संकल्प असतो. शेवटी गणपती प्रमाणे त्याचं विसर्जन होतंच""

"
पण तरी त्या माणसाने दिवस तर दारू सोडली ना, बहुतेक तो पुढे परत प्रयत्न करेल जानेवारीची वाट ना बघता. इथे प्रयत्न महत्वाचा आणि जानेवारी हे निमित्तपुरतंच असलं तरी काही ना काही चांगलंच घडवून आणतो ना"

"
पण मला नाही वाटत अशा प्रयत्नांना यश मिळत असेल" काका आता डिफेन्सिव्ह झाले होते.

"
हा स्टॅटिस्टिक कोणाकडेच नाही पण मला वाटत कि हि गोष्ट एवढी वाईट नाही"

"
मी कुठे म्हटलं कि हे वाईट आहे, मी म्हणालो 'हा सगळा मूर्खपणा आहे' आहे आणि मी अजून त्यावर ठाम आहे"


आजोबा आत्तापर्यंत आमचे बोलणे ऐकत होती. मी त्यांना या वादाचा उपसंहार करायला सांगितला.

आजोबा म्हणाले
"
काकाच म्हणणं खरं आहे जानेवारी हे नववर्ष म्हणून साजरं करायला काहीहि कारण नाही. मी हि पूर्वी याच विचाराचा होतो.  पण सध्याच्या जगात माणसाला एकमेकाला भेटायची सवड नाही म्हणून काहीतरी निम्मित काढून ते जर भेटतात ते चांगलंच आहे. उत्सव करणारा, आनंदात राहणार, नाचणारा गाणारा समाज हा निरोगी आणि निर्भिक असतो. म्हणून काही अर्थ नसला तरी असले सण असावे. आणि संकल्पाचं विचारलं तर नववर्षाचा संकल्प हा फक्त बोलण्याकरता असतो. मी आजपर्यंत कुणाला हि नववर्षाच्या संकल्पामुळे दारू किंवा सिगारेट सोडलेलं बघितलं नाही. पण जर नववर्षा मुळे कोणाला असा विचार करावासा वाटलं आणि त्यांनी दिवसा करता का होई ना पण संकल्प पाळला तर तो फायद्यातच मोजावा लागेल तोट्यात नाही"

- सचिन गोडबोले

No comments:

Post a Comment