आगामी कार्यक्रम - गीत रामायण

गीत रामायण! प्रत्येक मराठी माणसाच्या सांस्कृतिक भावविश्वाचा एक अविभाज्य भाग. एकाच कवीने वर्षभर रचलेला एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम म्हणजे गीत रामायण.

संता वाल्मिकींनी २८००० श्लोकांत राम कथा लिहिली तीच रामकथा एकूण ५६ गीतात गदिमांनी शब्दबद्ध केली आहे. या रचनेनंतर गदिमा आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जाऊ लागले. एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ असे सलग छप्पन्न आठवडे पुणे आकाशवाणीने हा कार्यक्रम प्रसारित केला. सुप्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके म्हणजेच बाबूजींनी ही सारी गाणी संगीतबद्ध केली होती. रामायणातील वेगवेगळ्या बत्तीस पात्रांच्या तोंडची ही गाणी वेगवेगळ्या गायकांनी गायली आहेत. गीत रामायण नऊ वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये भाषांतरित ही झाले आहे. रेडिओच्या प्रसारणानंतर संगीतकार गायक सुधीर फडके यांनी जगभर गीतरामायणाचे सादरीकरण अक्षरशहा हजारो वेळा केले तरीही त्याची लोकप्रियता कमी झाली नाही. सध्या हाच कार्यक्रम बाबूजींचे चिरंजीव लोकप्रिय संगीतकार गायक श्री श्रीधर फडके सादर करीत असतात. या वर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने नूतन मराठी वर्षाची उत्तम सुरुवात करण्यासाठी मित्रमंडळाने श्री श्रीधर जी फडके यांना गीत रामायण सादर करण्यासाठी निमंत्रित केले आहे. रविवार दिनांक १८ मार्च २०१८ रोजी संध्याकाळी .३० वाजता हा कार्यक्रम एसएलआर कन्व्हेंशन सेंटर येथे होणार आहे. तिकिटे book my show वर उपलब्ध आहेत आपण सर्व या कार्यक्रमाचा लाभ घ्याल याची खात्रीच आहे

धन्यवाद!


No comments:

Post a Comment