महाराष्ट्र आणि कर्नाटक यांचे नाते अगदी जुने. साहित्य आणि संस्कृतीचा इतिहास तपासताना प्रामुख्याने पुढे येतो तो व्यंकोजीराजांचा काळ.
शिवाजी महाराजांचे जेष्ठ बन्धु व्यंकोजी राजे यांनी कर्नाटकात तंजावरला आपले राज्य स्थापन केले. नुसते स्थापन करून थांबले नाहीत तर आर्थिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक सर्वच दृष्टीने ते संपन्न केले. आजही तंजावर त्या वेळच्या संस्कृतच्या व संपन्नतेच्या खुणा अंगाखांद्यावर बाळगून आहे.
महाराष्ट्रातून कर्नाटकात येताना त्यांनी वास्तुशिल्पी, मंदिरशिल्पी कामगार आणले, सुतार, गवंडी व अनेक निष्णात कारागीर तर आणलेच पण त्या बरोबर विविध क्षेत्रातील विद्वान, भाषातज्ज्ञ, कलाकार आणले. तंजावर ला स्वतः ची ओळख दिली. ते स्वतः ही अत्यंत
पराक्रमी, मुत्सद्दी राजकारणी व कलाकार होते. त्यांच्या पुढील पिढीतील राजे सरफोजी हे तर अत्यंत विद्वान, वेगवेगळ्या विषयात गती असणारे रसिक व कलावंत होते. ते स्वतः चांगले लेखक ही होते. आज उपलब्ध असणारे सर्वात जुने मराठी नाटक हे तंजावरला लिहिले गेले आहे. स्वतः राजे सरफोजी यांनी ८ मराठी तर काही संस्कृत व काही कानडी नाटके लिहिली. या नाटकांवर संस्कृत ची छाप असली तरी विषय मात्र वेगवेगळे होते. इतरांना ही लिहिण्यास त्यांनी खूप प्रोत्साहन दिले. अनेक जुनी कागदपत्रे व ग्रंथ जमा करून 'सरस्वती महाल' नावाचे वाचनालय सुरु केले. जुन्या हस्तलिखितांचा उत्तम सांभाळ करणारे ठिकाण म्हणून ते आज ही
भारतभरात प्रसिद्ध आहे.
बऱ्याच वर्षांपूर्वी माझ्या वाचनात कर्नाटकातील
एका लेखकांचे काहीशे वर्ष जुने बालनाट्य आले. त्याचे नाव होते - कृष्ण कावेरी वाद.
याचा अर्थ तेव्हाही बालनाट्यात झिरपण्या इतका हा विषय ज्वलंत होता. भाषेचा जुना ढाचा हा भाग सोडून दिला तर आज ही
हे नाटक सर्वांना आवडू शकेल असे आहे.
असे अनेक प्रकारचे साहित्य सरस्वती महाल वाचनालयात नीट जतन केलेले आहे.
राजे सरफोजी यांनी लहान व मोठे सर्वांचा विचार करून, मुलांना आवडेल अशा पद्धतीने इसापनीती अनुवाद मराठीत करून घेतला. त्यांच्या पासून प्रेरणा घेऊन नंतर छत्रे यांनी मुलांसाठी मासिक सुरु केले. मराठी साहित्यात बाल-साहित्याची मुहुर्तमेढ रोवण्याचा काम कर्नाटकात झाले आहे हे विसरून चालणार नाही.
साहित्या
इतकेच धार्मिक. सांस्कृतिक.नाते
ही महत्त्वाचे आहे. 'कानडाउ विठ्ठलु कर्नाटकु' म्हणत ते महाराष्ट्रात ते रुजलं आहेच.
या भाषाभगिनी जपण्याचे, हे नाते
समृद्ध करण्याचे काम नवीन पिढीने केले तरचा काळाच्या ओघात ते टिकून राहील...
No comments:
Post a Comment