नभात चांदणे जसे
तुझेच भास पाहतो
मनातल्या मनात मी शब्दचित्र काढतो
मनातल्या मनात...
मनातल्या मनात...
दुरुन तू मला सखे, उगाच बाहसी जणु
तुझाच चेहरा दिसे, सर्वदूर की जणु
शांत सागरी जणु, प्रलय आज भासतो
मनातल्या मनात...
फूल पाहते जशी, वाट, भ्रमर येउ दे
तशीच श्रावणी सखे, साद ऐकू येउ दे
साजणे तुझ्याविना, झुरुन रात्र जागतो
मनातल्या मनात...
पाहू वाट मी किती,अजून राती जागू मी
तुला समोर पाहण्यास, जीव अजून जाळू मी
तुझेच कर मी वल्लरी, स्वप्नि रोज मागतो
मनातल्या मनात...
--- प्रसन्न आठवले
No comments:
Post a Comment