तेजोनिधी लोहगोल - सुकृत ताम्हनकर

Select listen in browser.
गाणे ऐकण्यासाठी केशरी ➤बटन वर क्लिक करा.




गीत:          पुरुषोत्तम दारव्हेकर

संगीत :       पं. जितेंद्र अभिषेकी
मूळ आवाज: पं. वसंतराव देशपांडे
नाटक:         कट्यार काळजात घुसली
कट्ट्यासाठी गायन: सुकृत ताम्हनकर












तेजोनिधी लोहगोल, भास्कर हे गगनराज
दिव्य तुझ्या तेजाने झगमगले भुवन आज
हे दिनमणी व्योमराज, भास्कर हे गगनराज

कोटी कोटी किरण तुझे अनलशरा उधळिती
अमृतकण परि होऊन अणुरेणु उजळिती
तेजातच जनन-मरण, तेजातच नवीन साज
हे दिनमणी व्योमराज

ज्योतिर्मय मूर्ति तुझी, ग्रहमंडळ दिव्यसभा
दाहक परि संजीवक तरुणारुण किरणप्रभा
होवो जीवन विकास वसुधेची राख लाज
हे दिनमणी व्योमराज


No comments:

Post a Comment