पोक्त, अनुभवी, प्रिय व्यक्ती वदता
पक्व फलापरी जना रुचते
दांभिक 'गोड बोलणे' परी
दर्भाग्रापरी मनी सलते !!!
--देवयानी कुलकर्णी
खोटंनाटं गोड बोलण्यापेक्षा
खरं बोलण्याची करते अपेक्षा
गोड बोलण्याने होते फसगत
विश्वास नाही कुणाचा करवत
1.
मधुर वाणी जसं नारळाचं पाणी
वाटावा आनंद मिळून सा-याजणी
बोच-या शब्दांचे निवडुंग काटेरी
नका पसरवू घरीदारी-अंगणी
2.
गोड शब्दांचा सुखद दिलासा
वाटतो मनाला हवाहवासा
कडवेणाची झाक असणारा
रुक्ष स्पष्टपणा नकोनकोसा!!
No comments:
Post a Comment