अभिमान मानपत्र



मित्रमंडळाचं अध्यक्षपद ज्यांनि दोन वर्ष भूषवलं आणि मित्रमंडळाच्या कोणत्याही कामात अगदी घरच्या कार्याप्रमाणे जे कायम हातभार लावतात ते प्रदीप आणि अस्मिता ओक आपणा सर्वांना परिचित आहेतच. परंतु कुटुंबातील माणसाचा बाहेर मानसन्मान झाल्यावर जो आनंद सर्वांना वाटतो तोच आज मित्रमंडळ परिवारास होत आहे कारण महाराष्ट्र मंडळ बंगळुरू तर्फे दिला जाणारा अभिमानश्री हा पुरस्कार या वर्षी श्री प्रदीप ओक यांना प्रदान करण्यात आला आहे.

कानपूर येथील आय. आय. टी. मधून एम.टेक. केल्यानंतर त्यांनी TCS या कंपनीतून आपल्या करियरला सुरवात केली. त्यांनी प्रामुख्याने आपल्या कामात क्वालिटी कंट्रोल या क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित केले. श्री. प्रदीप ओक हे भारतातील पहिल्या वीस सर्टिफ़ाईड क्वालिटी ऑडीटर्सपैकी पैकी एक आहेत. त्यांची स्वतःची कंपनी 'ओक सिस्टिम्स' ही मुख्यत्वे Testing, QA या क्षेत्रांत काम करते. या कंपनीतर्फे अनेक कंपन्यांतील संगणकीय प्रणालींमध्ये दर्जाचे व्यवस्थापन केले जाते.


श्री. प्रदीप ओक यांनी क्वालिटी अश्युरन्स या विषयावर एक पुस्तकही लिहिले आहे. त्याच्या आजपर्यंत तेरा आवृत्त्या निघाल्या आहेत. काही इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये क्वालिटी अश्युरन्स साठी वेगळी केंद्रे स्थापण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. बंगलोर येथील ‘अमृता इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज’ या संस्थेच्या संस्थापक मंडळाचे ते सदस्य आहेत. बंगलोर येथील 'अदम्य चेतना' या संस्थेचे ते विश्वस्तही आहेत. शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांत ही संस्था भरीव कार्य करते. या संस्थेतर्फे बंगलोर, हुबळी, कलबुर्गी आणि जोधपूर येथील सरकारी शाळांतील दोन लाख मुलांना मध्यान्ह भोजन पुरवण्यात येते. स्वत:च्या कामाचा दर्जा उंचावत, समाजासाठीही उपयुक्त काम करणाऱ्या श्री. प्रदीप ओक यांचा सर्वांनाच अभिमान आहे!


अभिमान पुरस्कार हा महाराष्ट्र निवास बिल्डिंग ट्रस्ट तर्फे देण्यात येतो. यात मानपञ आणि रु.२५,०००/- आणि चांदीचे तबक यांचा समावेश असतो. हा पुरस्कार बंंगलोरमधील मराठी माणसालाज्याने आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे अशा व्यक्तींना देण्यात येतो. हा पुरस्कार महाराष्ट् मंंडळाच्या संस्थापक दिनीम्हणजेच गुढी पाडव्याला देण्यात येतो.


याआधी डॉ. पुष्पा द्रवीडसानिया, डॉ. किशोर फडके, डॉ. रोहिणी गोडबोले, डॉ. सुरेश देशपांडेउद्योजक श्री. निवास तुकये अशा मान्यवरांना देण्यात आला आहे. NAL चे संचालक श्री. जितेंद्र जाधव यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. 


महाराष्ट्र मंडळातर्फे या वर्षीचा योगदान पुरस्कार श्री. प्रकाश साठे यांना देण्यात आला. 


स्नेहा केतकर 













No comments:

Post a Comment