नयनांनी युद्ध पुकारले रणभूमीवर त्या प्रेमाच्या
काळही तेथेच थांबला, शंख वाजवतील चांदण्या
उघडले दार पापण्यांचे अन् केली ढाल काजळाची
वाहून गेला तो अोहळि अन् डाव पहिला जिंकले मी
डाव मांडीला दुसरा त्यांने आला प्रीतीच्या मोहरा संगे
त्यांच्या ओंजळी वाहिले मी अन् डाव दुसरा हारले
काळही चंद्रासह भुरळला, त्या नयनात अडकला
देवाने मध्यस्थ होऊनि या युद्धावर उपाय मांडला
मी जिंकले तर त्या सख्याला पापणीच्या कोठडीत बांधावे
तो जिंकला तर मला त्यांचा नयनात बंदिस्त ठेवावे
काळाची भुरळ उडता शंख वाजला युद्धविरामाचा
मी हारणे वा तू जिंकणे खरा विजय तर देवाचा . . .

स्वाती निरंजन
No comments:
Post a Comment