मागील भागात आपला गर्भधानापासून सुरु झालेला माहितीपूर्ण प्रवास जातकर्मा पर्यंत पोहोचला. आज जाणून घेऊ या षष्ठीदेवी पूजन, कर्णवेध, नामकरण व दुग्ध प्राशन या संस्कारांबद्दल.
बाळाच्या
जन्माच्या पाचव्या दिवशी षष्ठीदेवीची पुजा केली जाते. ह्या पूजे नंतर एक कोरा कागद व पेन पूजेच्या ठिकाणी ठेवले जाते. असं म्हणतात की देवी कुठल्या तरी रुपाने येऊन बाळाच्या कपाळावर त्याचे भाग्य लिहिते. षष्ठीदेवी ही पृथ्वीमातेचा सहावा अवतार समजला जातो. तिला बालके अत्यंत प्रिय आहेत. ती बाळाला आरोग्य व दीर्घायुष्य प्रदान करते व सर्व संकटात त्याचे रक्षण करते म्हणून तिचे पूजन करून प्रार्थना करण्यात येते. अपत्यप्राप्ती साठी षष्ठीदेवी च्या कथेचे वाचन व श्रवण करावे अशी वदंता आहे.
पारंपारिक दृष्टीने बाळावर बाराव्या दिवशी केला जाणारा संस्कार म्हणजे कर्णवेध. भारताप्रमाणे जगात अनेक देशात हा संस्कार केला जातो त्याची नावे आणि कारण मिमांसा वेगवेगळी इतकेच. ह्या विधी मागे ही आपल्या पूर्वजांचा सखोल अभ्यास दिसून येतो. हा संस्कार उत्तम शुभ दिवस बघून सूर्यप्रकाशात च करावा असा शास्त्रात उल्लेख आहे. कर्णवेध म्हणजे कान टोचणे . ह्यामध्ये मुलीचा डावा कान पहिला टोचतात तर मुलाचा उजवा. कान टोचण्या मागे अनेक उद्देश आढळतात. कान टोचण्या ने अंर्तकर्णाचे काम सुरळीत होते व त्यायोगे पवित्र ध्वनी लहरींचे ग्रहण बालका कडून होते. दूसरे कारण असे की कानाच्या पाळीच्या मागे अत्यंत सूक्ष्म डिप्रेशन असते त्या ठिकाणी रक्त वाहिन्यांचे जाळे असते. त्या नसेला छिद्र पाडले असता पुढील
आयुष्यात होऊ शकणाऱ्या श्वसन रोगांचे ऊच्चाटन होते. स्त्री जातकामध्ये भावी आयुष्यात ऋतु चक्र सुरळीत रहाते. शरीरातील ऊर्जा स्त्रोत सुरळीत रहावा यासाठी कानात सोन्याची अथवा तांब्याची तार घालतात. काही . संस्कृतीं मध्ये अंतः शक्ती जागृत होण्यासाठी कर्णवेध केला जातो. व्यक्ती तितक्या प्रकृती आणि धर्म तितक्या संस्कृती.
जातकाला स्वतःची ओळख देणारा संस्कार म्हणजे नामकरण. हा संस्कार करण्यामागचा उद्देश काय आहे ते बघु या. हा विधी सामान्यतः जन्माच्या अकराव्या अथवा बाराव्या दिवशी करतात. ह्या संस्कारांर्तगत प्रथम तांदूळावर
सोन्याच्या तारेने कुलदेवता भक्त लिहिले जाते. त्यानंतर जन्माच्या वेळी जो मराठी महिना असेल त्याप्रमाणे नाव ठेवले जाते. उदाहरण द्यायचे झाले तर चैत्रात जन्मलेल्या मुलाचे नाव कृष्ण तर मुलीचे वैकुंठी, तसेच वैशाखात जन्मलेल्या मुलाचे नाव जनार्दन व मुलीचे जनार्दना. तिसरे नाव जन्मनक्षत्राच्या चरणावरून ठेवले जाते त्याला ‘नावरसनाव’ असे म्हणतात. ही नावे गुप्त ठेवली जातात. चौथे व्यावहारिक नाव. वेदशास्त्रा नुसार प्रत्येक शब्दात अर्थ भरला आहे आणि त्याच्या अंगभूत कंपनशक्ती मुळे त्याला मंत्रत्व प्राप्त झाले आहे. अशा शब्दांचा विशिष्ठ लकबीने उच्चार केला तर त्यातील सूप्त सामर्थ्य प्रकट होते. म्हणून वारंवार उच्चारले जाणारे अपत्याचे नाव हे अर्थपूर्ण असावे.
पुढील विधी आहे दुग्धप्राशन. आपणास वाटेल की हयात कसला विधी. पण मंडळी आईच्या दुधा व्यतिरिक्त जर वरचे दूध बाळास द्यायचे झाले तर ते गाईचेच दयावे व उत्तम दिवस बघून पहिला दुधाचा घोट पाजावा . असे केल्याने बाळाला निसर्गतः दुधाची आवड निर्माण होते व भावी आयुष्यात वेगवेगळे कृत्रीम प्लेवर्स घालायचा खर्च वाचतो.
ह्या पुढील संस्कारांचा परामर्श भाग ३ मध्ये. आज इथेच थांबू या.
- आरती जोशी
No comments:
Post a Comment