मृदगंधाची ओली वचने सारी सृष्टी ल्याली
पहिल्या पहिल्या पावसाची पहिली सर आली
सूर्याच्या किराणांना काळ्या मेघांची नजर
हर्षाच्या किनाऱ्यावर ऋतुराजाचा बहर
ओले पंख धारांचे कण कण घेऊन आले
जणु ग्रीष्माच्या लाहीत शीत होऊन आले
वरुणाच्या ललकारीला विद्युल्लतेची साथ
प्रत्येक थेंबांत घेऊन हर्षाची नवीन बात
कळ्या-वेलींवर शहाऱ्यांची जणू बरसात
तप्त वातावरणी झाली हर्षाची सुरवात
ओल्या ओल्या पागोळ्यांची घ्यायला मजा
वरुण-वर्षा-वीज यांची विजयी सेना आली
पहिल्या पहिल्या पावसाची पहिली सर आली
--------------------------------------------------
No comments:
Post a Comment