'आनंदाचं शिक्षण स्वतःतच !'

प्रत्येक माणूस फक्त आणि फक्त आनंदासाठीच आयुष्यभर झटत असतो. कुठल्याही माणसाला तू कष्ट कशासाठी करतोस असे विचारले तर शेवटी उत्तर आनंदासाठी हेच असेल. पण आयुष्भर झटून काम करून आनंद मिळाला का? तर बहुतांशी उत्तर नाही असेच असते. ह्याच्या कारणाचा शोध घेतला तर लक्षात येईल कि माणूस आनंद नातेसंबंधामध्ये, पैशामध्ये, सत्तेमध्ये, भौतिक  गोष्टीमध्ये शोधतो. त्यामध्ये त्याला तात्पुरता आनंद मिळतोही पण काही काळापुरता. मग त्याला प्रश्न पडतो कि शाश्वत आनंद आहे का? तो कसा मिळेल ह्याचा तो शोध घ्यायला लागतो. त्याच्या लक्षात येते कि त्याची अवस्था कस्तुरीमृगासारखी झालेली आहे. आनंद आताच आहे पण आयुष्यभर तो बाहेर शोधल्यामुळे निराशा पदरी पडली.
खरा आनंद म्हणजे काय हे पूज्य पेठेकाकांच्या लेखातून वाचा.

लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
                                                            

                                                                         पूज्य डॉ सुहास पेठे काकांबद्दल 

डॉ. सुहास पेठे काका हे साताऱ्यातील आधुनिक दार्शनिक संत म्हणून ओळखले जातात. श्री ज्ञानेश्वर माऊलींपासून ते श्री जे. कृष्णमूर्ती यांच्यापर्यंत सर्व पंथांच्या उपासनेचे सार स्वतः आचरून सर्वसामान्य साधकांना सोप्या भाषेत सांगण्याचे असामान्य काम पेठे काकांचे आहे. प्रपंचात राहून परमार्थ कसा करायचा याचे उत्तम उदाहरण म्हणजे पेठेकाका. चोवीस वर्षे स्टेट बँकेत नोकरी करून २००१ मध्ये काकांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन उपासना व्यापक प्रमाणात चालू केली. त्यांचे वेगवेगळे उपक्रम जसे मौनमाळनामशिबिरेप्रश्नोत्तरसत्रेपदयात्राहरिजागरआत्मपरीक्षण शिबिरेमुलांची शिबिरेचिंतनसत्रचर्चा भेटी हे गेले अनेक वर्षे चालू आहेत. त्यांच्या जवळ जवळ १०० च्या वर पुस्तकांचे तसेच १२५ च्या वर व्हिडीओ सीडींचे प्रकाशन झाले आहे.

No comments:

Post a Comment