शब्दातील गोडवा


शब्दांचे महत्त्व खूप आहे - 
वाड्मयात, घरात, रोजच्या व्यवहारात!

बोलण्यात मार्दव, लाघव, संयम असला 
तर  'संवाद' उत्तम जातो साधला!

एका गोड आर्जवाचा शब्द साद घालतो  मनाला 
आणि एका  कटु शब्दाने तडा जातो भावनेला

साखरपेरणी नसावी उगाचच बोलण्यात पण
दुसऱ्याच्या भावना दुखवू नयेत याची असावी जाण

परखड शब्दांना घालून मुरड
आल्हादकारक अभिव्यक्तीशी घालावी सांगड 

शब्दातला निर्व्याज गोडवा जोडतो
मनामनांच्या नात्यांना बकुळीचा  सुगंध देतो

सकारात्मक वृत्ती  बोलण्याची
एक छान प्रवृत्ती माणसांना जिंकून घेण्याची !!

--- पुष्पा कुलकर्णी

No comments:

Post a Comment