पाक कृती - कॅडबरी



साहित्य
2 वाट्या कोको पावडर, 2 वाट्या मिल्क पावडर , 2-2.50 वाट्या साखर, 2 चमचे लोणी, पाणी

कृती :
प्रथम कोको पावडर आणि मिल्क पावडर एकत्र चाळून घेणे.
साखरेमध्ये एक वाटी पाणी घालून पाक करायला ठेवणे. 3 तारी पाक झाला की वरील मिश्रण त्यात घालून ढवळणे.
गॅस बंद करून पातेले खाली घेऊन त्यात 2 चमचे लोणी घालणे.
मिश्रण सैलसर असतानाच ग्रीस केलेल्या ट्रेमध्ये ओतणे.
10 मिनीटांनी वड्या पाडणे . कॅडबरी तयार!


संगीता कार्लेकर




No comments:

Post a Comment