I श्री गणेशाय नमः I
मार्कण्डेय ऋषि युधिष्ठिर राजाला
व्यास तीर्थाची कथा सांगतात, "विश्वामधील सरस्वती, गंगा, नर्मदा या सर्वच
नद्या जीवांना शुद्ध करतात परंतु नर्मदा त्यांच्यामध्येही परमशक्ती स्वरूप आहे कारण नर्मदेच्या जलामधील पाषाण
सुद्धा पुजिले असता ते जीवांना वांछित फळ प्रदान करतात. जिच्या जलाच्या आश्रयाने
शिळेमध्ये सुद्धा महान शिवतत्व स्फुरण
पावत. अन्य नद्यांच्यापेक्षा नर्मदेमध्ये ही विशेष गोष्ट आहे की तिच्या मधील दगड
देखील मनुष्याच्या इच्छा पूर्ण करतात. म्हणून अन्य नद्यांचे लक्षावधी कल्प स्मरण
केले तरी नर्मदेबरोबर त्यांची तुलना करता येत नाही.
समुद्रावरचा थरथराट अनुभवल्यानंतर
मन तिथेच रुंजी घालत होते. पण नर्मदेच्या तीरावर दर दिवशी नवीन अनुभव असायचा.
पुढची उत्सुकता होतीच अनुसूया मंदिर, टिलकवाडा आश्रम बघायची.
नारेश्वरला जातांना मध्ये भडोचला थांबून जरा ताजेतवाने झालो नाश्ता केला व ११०
किमी. चा प्रवास करून मालसर मार्गे नारेश्वरला आलो. इथे वासुदेवानंद सरस्वती (टेंबे
स्वामी ) यांनी चातुर्मास केला होता. मोठा आश्रम आहे. पायी परिक्रमावासीयांसाठी
रहायची सोय, अन्नछत्र, लायब्ररी, फोनचे बुथ इत्यादी सर्व सोयी आहेत. दत्ताचे,
गणपतीचे, शिवाचे मोठ्ठे मंदिर आहेत. खाली उतरून अर्ध्या किमी.वर नर्मदेचे अथांग
पात्र आहे. एकदम स्वच्छ निर्मळ अशी नर्मदामाई, त्यात बरेच गोटेपण आहेत. खूप छान वाटले.
आंघोळ करून नर्मदा अष्टक, आरती, जप करून आश्रम बघितला. जेवण झाले व पुढच्या
प्रवासाला दुपारी दोन वाजता निघालो.
नर्मदामाई |
हा नारेश्वर
आश्रम भालोदच्या दुसऱ्या तिरावर आहे. भालोदहून इथे बोटीने व्यवहार होतो. इथून पुढे जातांना वाटेत तिथे नर्मदेच्या
किनाऱ्यावर सत्यनारायण स्वामींचे मंदिर आहे. ते बघून खोपडीया इथे अनुसूया
मातेचे मंदिर आहे तिथे निघालो. अंधार पडायला लागला होता. मंदिर बरेच आंत होते.
आम्ही चौकशी करतच होतो. इतक्यात एक गृहस्त मोटरसायकलवर येतांना दिसले. आमच्या मैनेजरने
त्यांच्याकडे चौकशी केली असता. त्यांनी आपली मोटरसायकल परत विरुद्ध दिशेने वळविली
आणि ते आम्हाला मार्गदर्शन करत समोर निघाले. आम्हीपण त्यांच्या मागोमाग आमच्या बसने
निघालो ते थेट मंदिरापर्यंत. आणि दर्शन घडल्यावर लक्ष्यात आले की ते इथे पुजारी
होते. त्यांनी आम्हाला देवी अनुसुयाबद्दल संपूर्ण माहिती दिली. अनुसूयाच्या
पूर्वजांपासून हिच्या पोटी महान अंश जन्माला येणार ही माहिती होती. अत्री ऋषी व
अनुसूया यांनी इथे खडतर तपसाधना केली होती. त्यांनी जे अनुष्ठान केल ते म्हणजे भर
पावसांत नर्मदा नदीत उभे राहून तप करायचे; थंडीच्या दिवसांत ओलेत्यानी उघड्यावर
ताप करायचे; भर उन्हाळ्यांत गर्मीत होमकुंड मध्ये पेटवून त्याला प्रदक्षिणा
करायच्या. तेंव्हा त्या महान साध्वीच्या पोटी दत्तगुरू जन्माला आले. तिच्या
अनुष्ठानामुळे तिथली माती पवित्र झाली. ती
आपण पण व्रत उपासना करत असतांना अंगाला लावली तर चर्मरोग, श्वेतकुष्ठ सुद्धा बरे
होते अशी श्रद्धा आहे. त्याचे कोणी मूल्य मागत नाही. श्री दत्तात्रेयांचे व
अनुसूयामातेचे दर्शन घेतले. मन अगदी भरून तिथली माती पवित्र झाली. ती आपण पण व्रत
उपासना करत असतांना अंगाला लावली तर चर्मरोग, श्वेतकुष्ठ सुद्धा बरे होते अशी
श्रद्धा आहे. त्याचे कोणी मूल्य मागत नाही. श्री दत्तात्रेयांचे व अनुसूयामातेचे
दर्शन घेतले. मन अगदी भरून आले. त्या मातेच्या पोटी जन्माला आल्यामुळे आपल्याला
आद्यगुरु श्री दत्तगुरू मिळाले. आणि या विचाराने भारावून जाऊन आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी तिलकवाडीला
पोहचलो. इथे वासुदेवानंद सरस्वतींनी ( टेंबे स्वामी ) आले. त्या मातेच्या पोटी
जन्माला आल्यामुळे आपल्याला आद्यगुरु श्री दत्तगुरू
श्री सत्यनारायण स्वामींचे मंदिर |
मिळाले.
आणि या विचाराने भारावून जाऊन आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी तिलकवाडीला पोहचलो. इथे वासुदेवानंद सरस्वतींनी ( टेंबे स्वामी ) चातुर्मास केला होता. त्यांचा आश्रम आहे. रात्र बरीच झाली होती. परंतु त्यांना फोन करून ठेवल्यामुळे ते आमचे वाटच पाहत होते. आमची त्यांनी मुक्कामाची सर्व सोय केली होती. आश्रम एकदम स्वच्छ, गरम पाण्यापासून सर्व आधुनिक सोयींनी युक्त असा आहे. जे पायी परिक्रमावासी येतात त्यांना राहायला व सैपाकासाठी पण जागा आहे. इथे छोटा बगीचा, मंदिर, ध्यानकेंद्र आहे. खूप छान वाटले. थकवा पळून गेला. रात्री जेवण करून झोपलो.
आणि या विचाराने भारावून जाऊन आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी तिलकवाडीला पोहचलो. इथे वासुदेवानंद सरस्वतींनी ( टेंबे स्वामी ) चातुर्मास केला होता. त्यांचा आश्रम आहे. रात्र बरीच झाली होती. परंतु त्यांना फोन करून ठेवल्यामुळे ते आमचे वाटच पाहत होते. आमची त्यांनी मुक्कामाची सर्व सोय केली होती. आश्रम एकदम स्वच्छ, गरम पाण्यापासून सर्व आधुनिक सोयींनी युक्त असा आहे. जे पायी परिक्रमावासी येतात त्यांना राहायला व सैपाकासाठी पण जागा आहे. इथे छोटा बगीचा, मंदिर, ध्यानकेंद्र आहे. खूप छान वाटले. थकवा पळून गेला. रात्री जेवण करून झोपलो.
उषेने काढलेली रांगोळी |
१९ डिसेंबरला सकाळी पाहटे उठून स्नान
वगैरे करून (खूप दिवसांनी अंघोळीच गरम पाणी मिळाल होत ) खालून नर्मदा वाहत होती, तिथे
पूजा करायला गेलो असता उषेची सुरेख लाली पसरलेली दिसली. आकाशांत विविध रंग अगदी
थोड्याथोड्या वेळाने बदलत होते. असे वाटले की जणू सात घोड्यांच्या रथातून सूर्यनारायण
येणार म्हणून मोठमोठ्या रांगोळ्या उषेने काढल्या. मन पवित्र आनंदी झाले. शांतता
असल्याने नर्मदेच्या पाण्याचा खळखळाट व पक्षांचे पहाटेचे कूजन पण ऐकता आले. अशा या
पवित्र ठिकाणी आपल्याला ध्यान करता येते ही आपली पूर्व पुण्याई
असल्याची खात्री पटली. आज बराच प्रवास होता. म्हणून थांबायची इच्छा असली तरी लवकर
निघावे लागले. पराटे बरोबर बांधून घेणार होतो. म्हणून आम्हीपण पराटे करायला मदत
केली. व सर्वांचा निरोप घेऊन गरुडेश्वरला
गेलो.
पराटे करतांना |
गरुडेश्वर |
तिथे वासुदेवानंद सरस्वती यांनी समाधी घेतली होती. त्यांचे मोठे मंदिर आहे. इथेपण
दत्तांचा वास होता. त्यांच्या पादुका
आहेत. खालच्या बाजूने नर्मदा वाहते. इथे गणपतीचे, जगदीश्वराचे व निलकंठेश्वर शिवाचे
मंदिर आहे. परिसर छान हिरवागार आहे. आश्रमांत राहण्याची सोय आहे. अन्नछत्र पण
असते. त्यामुळे परीक्रमावासियांची छान सोय होते. आजूबाजूच्या आदिवासी क्षेत्रासाठी
इथे कार्यालय आहे. ते कपडे व पैसे दान म्हणून स्वीकारतात व त्यांच्यात वाटप करतात. आजूबाजूच्या आदिवासी क्षेत्रासाठी इथे कार्यालय आहे. ते कपडे व पैसे
दान म्हणून स्वीकारतात व त्यांच्यात वाटप करतात.
वासुदेवानंद सरस्वती ( टेंबे स्वामी ) समाधी मंदिर |
लग्नाचा वाढदिवसाप्रीत्यर्थ फाफडा जिलेबीची पार्टी |
पुढे रात्री उशिरा आम्ही महेश्वरला धर्मशाळेत पोहचलो. सगळे
खूपच थकले होते. जेवण करून झोपलो. सकाळी महेश्वर बघायचे होते. देवी अहिल्याबाईंचा
राजवाडा व नर्मदा तिरावर बांधलेला सुंदर घाट बघायचा होता.
No comments:
Post a Comment