शाळेत असताना मला modelling मध्ये career करावे असे खूप वाटायचे. मी बाबांना विचारले होते. पण त्यांना तेव्हा फार
पसंत आहे असे वाटले नाही. मग मी बाकीचे career options चा विचार सुरु केला. कधी lawyer, कधी fashion designer तर कधी hair stylist असे रोज माझे choices बदलायचे. दहावी झाल्यानंतर मी commerce ला Jain college मध्ये admission घेतली. सुरीवातीला
रुळेपर्यंत बरे वाटले पण मग मला लक्षात आले की मला ते आवडत नाही. नंतर मी पुण्याला
जाऊन home science साठी admission घेतली.
२. गंधाली, acting / Modelling आपण निवडावे असे का वाटले?
मला आठवतेय, आई व बाबा कुठल्यातरी कार्यक्रमासाठी चालले होते त्यांनी T school ची जाहिरात पहिली. मला त्याबद्दल माहिती काढण्यास
सांगितली. ती माझी ह्या क्षेत्रात जाण्यासाठीची पहिली स्टेप म्हणायला हरकत नाही.
२०१५ च्या ऑक्टोबर महिन्यात "The
next miss supermodel" स्पर्धा होती. त्यात मी भाग घेतला, दुसरी आले.
तिथून माझ्या modelling ची सुरुवात झाली.
आरती, तुम्ही permission लगेच
दिली का? काय विचार केला?
आरती:(गंधालीची आई)
गंधालीला permissionमागण्याची वेळच आली नाही. तिचा creative career कडे असलेला
कल आम्हाला प्रकर्षाने जाणवत होता. Photography
मध्ये career करायचे की modelling मध्ये, fashion designer व्हायचे की hair
stylist अश्या संभ्रमात असताना आम्हाला श्री. प्रशांत दामलेंच्या T school ची जाहिरात दिसली. मग आम्ही तिला त्याबद्दल
विचारले.
३. गंधाली, प्रशांत दामले acting course बद्दल थोडे सांग?
प्रशांत दामले यांचा
acting चा तीन महिन्याचा T-school course आहे. त्यामध्ये गाणे, नाच व acting चे बेसिक धडे शिकवले जातात.
प्रशांत दामले स्वतःच शिकवतात. तीन महिन्यांनंतर एक फायनल performance असतो. खूप गोष्टी शिकायला मिळतात. माझ्यासाठी तो experience खूपच छान होता.
४. गंधाली, शोर्ट फिल्म चा अनुभव कसा होता?
शोर्ट फिल्म चा अनुभव
पूर्णपणे नवीन होता. पहिल्यांदाच professionally कॅमेरासमोर जाणार होते. Makeup, camera, set हे सगळे बघून खूप मस्त वाटत होते. I was very excited about the shoot. मी माझ्या ओळखीच्या
सगळ्यांना शूटिंग बद्दल सांगितले होते. खरतर मला वाघोलीला म्हणजे खूपच लांब जायला
लागले होते. माझ्या Makeup ला खूप वेळ लागला
होता. आपल्याला imagine करता येणार नाही की इतके Makeup चे layers असतात. पूर्ण
दिवस शूटिंग करूनसुद्धा आम्ही दमलो नव्हतो.
५. पहिला ब्रेक
ज्याला म्हणता येईल - मिस पुणे तो योग कसा आला?
Actually त्याचे नाव "The next miss
Super model" असे आहे. त्याबद्दल
मला वर्षा इनामदार यांनी सांगितले होते. त्या T-school पुणे
च्या coordinator आहेत.
त्यांनी मला modelling मध्ये interest असेल तर फोन कर म्हणून सांगितले होते. फोन केल्यावर लगेच बोलावले. मी
पंधरा मिनिटात पोचले. त्यांनी माझी audition
literally रस्त्यावर घेतली. त्यांनी माझा walk बघितला व मला select केले.
६. गंधाली, त्यानंतर मिस अर्थ ह्याबद्दल सांग.
" Pageants teach you life lessons" असे म्हणतात ते अगदी बरोबर आहे. Miss earth
India चा
प्रवास खूपच वेगळा होता. Its altogether different world. खूप मेहनत करावी लागते.
Diet, weight loss and ramp walk खूप महत्वाचे असते. मला स्वतःला ह्या pageant नंतर Independent and Confident वाटले.
७. आरती, ह्या
सगळ्या तयारीला किती वर्षे द्यावी लागतात?
कोणत्याही क्षेत्रात
career करण्यासाठी योग्य प्रशिक्षण अतिशय महत्वाचे असते. Acting classes, grooming classes, rehearsals ह्या सगळ्याची तयारी
असावी लागते . खूप कष्ट व खडतर routine ची सवय व्हायला लागते. जनसंपर्क असावा लागतो.
साधारणपणे तीन ते चार वर्षे जम बसायला लागतात.
८. गंधाली, grooming regime
कसे असते? काय काय शिकवतात?
आपल्याला
काहीच कल्पना नसते पण Grooming मध्ये खूप गोष्टी येतात जसे कसे चालायचे, कसे बोलायचे, कसे व कुठले कपडे
घालायचे इत्यादी. हे सगळे शिकवायला expert ची गरज असते. रितिका रामत्री हा व्यवसाय गेले अठरा
वर्षापासून करतात. त्याचे नाव "the tiara" . मी त्यांच्याकडे एक वर्षाचा course केला होता. त्या प्रचंड practice करून घेतात. आम्हाला diet progress पाहून rewards हि देतात. वेगवेगळे tiaras देतात. मी सगळे तिथून life
lessons घेऊन आलीय.
९. गंधाली, सध्या तू काय करतेस? कसली तयारी सुरु आहे?
सध्या मी २०१७ च्या competitions साठी तयारी करतेय. त्यासाठी मला खूप weight loss करावा लागणार आहे. मी BA in English literature सुद्धा करतेय.
१०. गंधाली आणि
आरती, ज्यांना ह्या क्षेत्रात इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल?
गंधाली:
खूपच hard work ची गरज आहे. जेवढे सोपे वाटते तेवढे अजिबात नाही. Modelling ची सुरुवात करायची असेल तेंव्हा जरूर "the
tiara" मध्ये जाऊन course करा.
आरती:
या क्षेत्रात
येणाऱ्या मला-मुलीनी स्वतःच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्याची विशेष गरज
आहे.शिस्तबद्धता, ठराविक आहार, योग्य व्यायाम, भाषेवर प्रभुत्व, नियमित वाचन,
सूक्ष्म निरीक्षण शक्ती या गोष्टी जोपासण्याची गरज आहे. योग्य professional
courses, grooming classes यांची खूप मदत होते.
गंधालीच्या workshop ची काही क्षणचित्रे
मुलाखत: सौ. मंजिरी सबनीस
No comments:
Post a Comment