रेसिपी - नारळीभात (साखरेचा)



साहित्य : २ कप बासमती तांदूळ, २ १/४ कप साखर, १ कप नारळाचा चव, १ चमचा लिंबाचा रस, ४ ते ५ लवंगा, ४ वेलदोडे, ४ चमचे तूप ,बदामचे काप , बेदाणे आणि केशर.

कृती : तांदूळ अर्धा तास आधी धूवून ठेवणे. तांदूळाच्या दुप्पट पाणी, लिंबाचा रस, केशर, लवंगा, वेलेदोडे असे पातेल्यात घेऊन ते राईस कुकर मध्ये ठेवणे. मऊ व मोकळा भात करून घेणे.

पातेल्यात साखर व पाणी एकत्र करून पाक करायला ठेवणे. एकतारी पाक करून त्यात नारळाचा चव व मोकळा केलेला भात धालणे . वर ४ चमचे तूप सोडून मंद गॅसवर १० मिनीटे वाफ येऊ द्यावी. बदामाचे काप व बेदाणे घालून पुन्हा मंद गॅसवर ठेवणे.


संगीता कार्लेकर


No comments:

Post a Comment