वागणे तुझेसुधा तिच्यापरीच पावसा
पार कोसळूनही सरासरीच पावसा!
भेटली नसेल ती म्हणून काय एवढे
राग हा नव्हे बरा स्वतःवरीच पावसा!
पावसात चिंब चिंब पाहिल्यावरी तिला
वागलास तू सुद्धा कसातरीच पावसा!
ऐकु दे मला तिचेच शब्द, सूर,
शांतता
धाड दोन-चार तू मुक्या सरीच पावसा!
हो तिला पसंत तू... मनातला वसंत तू
प्रेमही तिचे
सख्या तुझ्यावरीच पावसा!
No comments:
Post a Comment