अहो, गोष्ट सांगते ऐका, एका वटसावित्रीच्या
पूजेची|
नववधूच्या
पहिल्या-वहिल्या वर्षाच्या पूजेची,
साथ
होती ज्याला आम्हा मैत्रिणींच्या प्रेमाची|
जमायची
वेळ होती बाराच्या ठोक्याची,
अगदी
अस्सल सरदारजीच्या टाईमची|
नटून-थटून
साऱ्या साळकाया-माळकाया,
जमलो
होतो एकीच्या घरी|
पूजेची झाली जय्यत तयारी, अहो पूजेची झाली जय्यत तयारी
अहो, पुढील गम्मत-जम्मत काय सांगू तुम्हाला,
वेगवेगळ्या
जणींच्या वेगवेगळ्या तऱ्हा,
पाहायला
मिळतील आज तुम्हाला|
कुणी आशीर्वादाची
फुले वेचिली वाकून,
तर कुणी
बत्तीशीचे दर्शन दिले दात दाखवून|
अहो, एकीने तर चक्क आम्हाला
साक्षात
वडाचे वृक्षही दिले दाखवून|
पण ह्या
सर्वांमध्ये एक होती एव्हरग्रीन
बाकी
मात्र सगळ्या होत्या ब्युटीक्वीन|
अशा या
सुरेल वातावरणात कशी झाली असेल पूजा,
या
सर्वांची नुसतीच कल्पना करा आता|
हळदकुंकू
वाहून झाले, प्रदक्षिणाही घालून झाल्या,
मनोभावे
पूजा-आरतीही झाली,
अहो, खरी गम्मत तर पुढे आली|
पूजेच्या नावाखाली या बायकांनी कशी धमाल केली|
अहो, खरी गम्मत तर पुढे आली|
पूजेच्या नावाखाली या बायकांनी कशी धमाल केली|
कुणी
आणली खिचडी, तर कुणी व्हेपर्स वडे,
कुणी
आणली रसाळ फळे तर कुणी कोशिंबीर-पेढे|
या
सर्वात भर पडली बासुंदी आणि नारळ वडीची,
अहो, काय काय म्हणून सांगू तुम्हाला कथा या बायकांची|
हास्य
हे आम्हा मैत्रिणींचे माहेरघर,
हसण्याच्या
उधाणाने दणाणले मैत्रिणीचे घर|
अहो, ह्या वयात हीच तर एकमेव गुरुकिल्ली आहे
आमच्या
जगण्याची, मैत्रीचे नाते जपण्याची
स्वतःला
एव्हरग्रीन ठेवण्याची|
अहो, बघताय काय असे माझ्याकडे,
गम्मत
नाही करत मी
whatsappच्या ग्रुपवर पहिले
आजच
याचे प्रुफ मी|
सावित्रीला
नमन करून या सर्वच शेवट केला गोड
अशीच
आनंदमयी वट-पोर्णिमा, आम्हाला दरवर्षी घडू दे, असाच
साक्षात्कार आम्हा मैत्रिणीना लाभू दे
हेच
मागणे तुझ्याकडे आमचे, सावित्री, हेच मागणे तुझ्याकडे आमचे|
No comments:
Post a Comment