संपादकीय
नमस्कार
गणेशोत्सव साजरा करून आता नवरात्रीच्या मंगलमय पर्वात कट्टा अंक आपल्या भेटीला
येत आहे.
ह्या कट्टा मध्ये वाचा महायोगी अरविंदांवरील प्राचार्य शिवाजीराव भोसले
यांच्या भाषणाचा दुसरा भाग.
जाने कहाँ गये वो दिन लेखात वाचा बदलत्या दिवसांबद्दल.....कोपनहेगेन डायरीत वाचा -निरोप घेतांना ......कंबोडियातील विहारेश्वराबद्दल वाचा डोळस भटकंती मध्ये ..आणि मातेच्या शक्ती रुपाबद्दल वाचा जीवनस्पर्शी मध्ये.
स्पंदन मध्ये वाचा हस्त नक्षत्राबद्दल ....आणि कधी आणि का थांबावे याबद्दल.
थांबण्याबद्दल बोलताना - मित्रमंडळ
कट्टा गेली ७ वर्षे आपल्या भेटीला येत आहे. या काळात कट्टा संपादकीय मंडळाने,
नव्या नव्या कल्पना राबवल्या. अनेक विषयांवरचे लेख वाचकांना वाचायला दिले. अनेक
लेखमालातून वेगळी माहिती दिली. नवे विचार मांडले.
आता एका नव्या टीमसोबत, नव्या लेखकांना, नव्या विषयांना घेऊन कट्टा नव्या
रुपात येण्याची गरज आहे. आम्ही नव्या लेखकांच्या, संपादकांच्या शोधात आहोत. आमची
सध्याची टीम नव्या टीमला संपूर्ण सहकार्य करेल.
ज्यांना कट्टा संपादक मंडळात काम करायचे आहे त्यांनी कट्टा मेलवर संपर्क
करावा.
लोभ होताच आता साथ ही मिळेल अशी आशा आहे.
लवकरच नव्या टीमसोबत कट्टा आपल्याला भेटायला येईल या आशेसोबत कट्टा संपादक
मंडळ आपली रजा घेत आहे.
स्नेहा केतकर
No comments:
Post a Comment