चारोळ्या - वारकरी


















आपल्या सगळ्यांच्याच मनात असतो
एक वारकरी लपलेला,
वरून कितीही आव आणला, 
तरी भक्तीत बुड़ालेला...
काटेकोर वागणारा,सुधारलेला - पुढारलेला.
पण मनातल्या विठूच्या प्रेमात रमलेला !
तुळशीची माळ न घालताच, 
अदृष्य वारीला चाललेला !!

©सुजाता मोघे



अजब हा भक्तीभाव 
ना कुणी थोर अथवा लहान 
कशाला ऊन पावसाची पर्वा 
विठूरायाच्या भेटीची अोढ सर्वा 
अखंड चालती पाऊले सारी 
हीच जगावेगळी पंढरीची वारी

©वैशाली गोडबोले


आयुष्याच्या 'वारी'मध्ये 
सोळा कलांचे वाजावे  टाळ 
रहावे सभान सजग
कधी सोडू नये ताळ||
          
©स्मिता शेखर कोरडे

         








निरागस मनाची पाटी असावी कोरी 
प्रेमाने भरावी ह्रदयाची झारी,
पंढरपूर असेल मग आपल्याच घरी,
सुंदर आणि आनंदी होईल आयुष्याची वारी!!
----------------------------------------------------------------------------

 वारकरी दंग त्यासी 
 . . . . . . . . विठूचा हो संग,
विठूचा तरंग
 .   . . . . विठूचाच रंग,
वितळला सारा जंग,
 .    . स्वये झाला हो अभंग!!!
------------------------------------------

पाई पाई करत वारी 
गेलो पंढरपूरात,
तर नव्हता देव राउळात!
म्हटल देवा असा काउन 
केला घात?
तर देव म्हने अबे,
"मी तर व्होतो तुझ्याच ह्रदयात!!!

© अनुराधा रानडे





2 comments:

  1. छानच अनुराधा व सुजाता.

    ReplyDelete
  2. सर्वांचे आभार ! 😊🙏🌹

    ReplyDelete