का
अजुनी गुंततो मी स्मृतींच्या जाळ्यांमध्ये
का
अजुनी मज दिसेना मेखला गगनामध्ये||
का
न स्फुरते काव्य मजला लेखणी हातामध्ये
का
न घडते चित्र सुंदर मूर्त जरी नयानामध्ये||
का
न पडती सूर कानी वेळूच्याही वनामध्ये
का
न देती वास मोहक गुच्छ बहु हातामध्ये||
का
न भिजतो देह माझा मेघ जरी तो कोसळे
का
न थिजतो देह माझा हिम निरंतर पाघळे||
का
न फुटते आर्त ओठी वेदना देहामध्ये
का
न तुटते स्वत्व माझे अवहेलना सर्वामध्ये||
उत्तरे
सारी गवसली पाहता आरशामध्ये
राहिलो
न सजीव मी बदललो अश्मामध्ये||
सुख-दु:ख-क्रोध-माया
गोठली अंतरामध्ये
कुणीही
फेकावे उगाचच दगड म्हणून रस्त्यामध्ये||
फिरुनी
होईन का सचेतन मूर्त मी सत्यामध्ये
शोधती
देवाधिकांना निर्जीव त्या दगडामध्ये||
हरवलो
मी सजीव निर्जीव घोर या समरामध्ये
बुडून
जावे त्यापरी खोलवर सिंधूमध्ये||
--- आनंद गोगटे
सुरेख!
ReplyDelete