अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या
मुलभूत गरजा असतात. त्याप्रमाणे वनस्पती वाढीसाठी माती, पाणी
आणि सूर्यप्रकाश या मुलभूत गरजा असतात. या तिन्ही गोष्टींविषयी आपण या भागात
माहिती घेऊया.
पाण्याची गरज सर्व वनस्पतींना असते पण त्याचे प्रमाण कमी-अधिक असू शकते.
झाडांना भरपूर पाणी घालणे किंवा खूप कमी पाणी घालणे या दोन्ही गोष्टी चुकीच्या
आहेत. झाडांना भरपूर पाणी देणे म्हणजे रोगांना आमंत्रण देण्यासारखे आहे. तर
झाडांना कमी पाणी देणे म्हणजे त्यांची ताकद कमी करण्यासारखी आहे. ती कोमेजून
जातात. जेव्हा रोप लहान असते तेव्हा अगदी कमी पाणी पुरते. पण जस जसे रोप वाढत जाते
तस तसे मुळाच्या वाढीसाठी म्हणजे मुळे खोलवर जावीत यासाठी पाणी थोडे थोडे वाढवावे
लागते. डेरेदार वृक्ष उन्हाळ्यातही तग धरून असतात तर काही झाडांची आडवी पसरलेली
वरवरची मुळे तग धरू शकत नाहीत. ती झाडे कोमेजून जातात, यावरुन लक्षात येईल.
झाडांना पाणी कधी घालायचे हे देखिल ठरवावे लागते. सकाळी पाणी घातले तर उन्हामुळे
बाष्पीभवन होवून घातलेल्या पाण्याची नासाडी होते. अगदी नगण्य स्वरुपात पाणी मिळते
झाडांना. तेव्हा सूर्यास्त ते सूर्योदय हीच योग्यवेळ आहे झाडांना पाणी घालण्याची.
जरी सूर्योदय वेळी पाणी घातले तरी बाष्पीभवनाला सुरुवात होईपर्यंत मातीने बहुतांश
पाणी शोषून घेतलेले असेल.
उन्हाळ्यात मात्र सकाळ-संध्याकाळ दोनदा पाणी घालणे श्रेयस्कर ठरेल. कारण उन्हाळ्यात बाष्पीभवन जास्त होत असते. बरे झाडांना पाणी कसे घालावे? पाईपने कधीही घालू नये. कारण पाईपने force ने पाणी पडते. त्यामुळे माती कुंडीबाहेर पडते, मुळेतरी उघडी पडतात किंवा बियांची पेरणी केली असेल तर त्यातरी उघड्या पडतात. त्यामुळे लहान प्लास्टिकच्या भांड्याने तरी पाणी घालावे किंवा आपल्या पाणी प्यायच्या भांड्याने. झारी वापरली तर उत्तमच. पाणी घालताना बाजूने, कडेने घालावे. जमिनीत रोप असेल तर रोपाच्या खोडाजवळ किंवा कुंडीच्या मधोमध पाणी घालू नये. पाणी आपण बरोबर घालतोय ना हे कळण्यासाठी माती बघायची. जर हाताला चिकटली तर पाणी जास्त झाले आहे आणि हाताला नुसतीच ओलसर जाणवली तर आपण योग्य प्रमाणात पाणी घातले आहे असे समजावे. साधारणतः ढोबळपणे कुंडीच्या आकारमानाच्या पंचवीस टक्के पाणीच झाडाला आवश्यक असते. शिवाय पाणी कुठलेही वापारले तरी चालेल. डाळ-तांदुळ धुतल्यावरचे पाणी, RO चे waste जाणारे पाणी, rain water harvesting केलेले असेल तर ते पाणी, अगदी कुठलेही. पूर्वी गावांमध्ये आंघोळीच्या पाण्याचा पाटच झाडांना वापरायची पद्धत होती. एकदा का अंदाज आला की कालांतराने आपणच वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरुन पाण्याचे प्रमाण, कसे, कधी, कशाने घालायचे हे सगळे आपण आपले ठरवू शकतो.

काही प्रकारच्या orchids ना शेडमधेच ठेवायचे असते मातीशिवाय (कोळश्याचा बेड), आठवड्यातून एकदाच पाणी घालायचे
असते (पण micronutrients विरघळविलेले पाणी). अगदी कमी कष्टात सुंदर फुले फुलतात. अशाप्रकारे निसर्ग
माणसाच्या जवळ यायला ऊत्सुक असतो फक्त आपल्याला पाऊल पुढे टाकायची गरज असते.
वनस्पतीच्या मुलभूत गरजा आता आपल्याला कळल्या. पुढच्या भागात कुंडी कशी तयार करायची, जमिनीत कसे रोप लावायचे
याविषयी सविस्तर बघूया.
- सौ. रूपाली गोखले
- सौ. रूपाली गोखले
Very nice written & informative article
ReplyDeleteVery nice written & informative article
ReplyDeleteअतिशय उपयुक्त माहिती आहे - बाग छान फुलेल
ReplyDeleteआवर्जून कळविल्याबद्दल धन्यवाद.
ReplyDelete