गोडवा


फुलांचे गोड बोल 
म्हणजे दरवळणारा सुगंध

वाऱ्याची शीतल झुळूक 
जणू गोड कुजबुज

पावसाचे पडणारे थेंब असतात 
गोड जीवनामृत  

सागराचे गोड हितगुज असतात 
संथ लयबद्ध लाटा   

हिरव्यागार धरित्रीचा असतो 
सुखद बोलका स्पर्श

आभाळातले तारे 
माझी एकेक गोड आठवण

अवीट गोड सारे क्षण 
आयुष्यातील साठवण

- सौ. विनया पराडकर

1 comment: