शब्द-सूरांच्या जगात...

आता सरला संचय, दिसा दिसांची दि सय
ठेवोनी जाती अमेय, माघारा।।

डॉ. विनायक कांबळे या मित्राची सुंदर कविता; दोन-एक वर्षांपूर्वी फेसबुकवर वाचली आणि आवडली. किती लाडका हा बाप्पा आपल्या सगळ्यांचा... तो येणार म्हटलं की उत्साहाचं उधाण नुसतं बघत राहावं... त्याच्या आवडणाऱ्या फुलापासून ते मोदकापर्यंत... त्याला काय देऊ आणि काय नको असं होऊन जातं. या उत्साहाच्या भरात तो थोड्याच दिवसांचा पाहुणा म्हणून आलाय... परत त्याच्या घरी निघून जाणार आहे याचं भानच राहात नाही! आणि जेव्हा तो दिवस येतो तेव्हा मनातली कालवाकालव आणि डोळ्यातलं पाणी... थांबतच नाही.

कोणतीही कविता वाचली ना की मी ती मनात सोडून देते... तिला रुजू देते... मग काही काळाने ती सुरांमधून व्यक्त व्हायला लागते. मला या कवितेचा एक गुण आवडला तो म्हणजे यात आर्तता असूनही अतिरेक नाही, melodrama नाही. कारण ही पक्की खात्री आहे की हा विरह काही कायमचा नाही. आणि म्हणूनच मी चाल बांधली ती याच शांत, गंभीर, विरहार्त तरीही आश्वस्त वृत्तीची... "मनाचा राजा... भूप" असलेल्या बाप्पासाठी स्वरांनातूनही "भूप"च आला... आणि चाल तयार झाली... आर्तता व्यक्त करतानाही व्याकूळ न होता मन आवरून पुनर्भेटीचं आश्वासन मागणारी...


धन्यवाद... 
प्रवरा संदीप





1 comment:

  1. सुरेख ! कविता, स्वर आणि संगीत ... मनाला भिडणारे शब्द. कुणाही मराठी मनाला स्पर्श करणाऱ्या भावना !!

    ReplyDelete