घ्या संकल्प पर्यावरण रक्षणाचा

अज्ञानात सुख असते असे म्हणतात! पण खरंच आजच्या जगात हे खरं आहे का? विशेषतः ते जेव्हा संपूर्ण जगाशी निगडीत असते तेव्हा? हा प्रश्न विचार करायला लावणारा आहे. सध्याची परिस्थिती अशी आहे कि आपल्या आजूबाजूच्या बऱ्याच लोकांना आपण अज्ञात आहोत हे सुधा ज्ञात नाहीये. अर्थात माझी परिस्थिती फार वेगळी नव्हती काही वर्षांपूर्वी, पण गरज म्हणा किंवा अजून काही मी प्रयत्न सुरु केले...

आपल्या २५ वर्षांपूर्वीच्या अभ्यासानुसार ध्वनी, हवा आणि पाणी प्रदूषण हे मुख्य आणि त्या प्रमाणे कमी आवाज, वाहनांचा धूर कमी इत्यादी गोष्टी करणे हा आपला सहभाग. पण जशी माणसाने प्रगती केली तशी प्रदूषणाने सुद्धा प्रगती केली. प्रदूषित होण्यात जमीन सुद्धा असू शकते ह्याची मला जाणीव झाली आणि पाणी, हवा ह्या गोष्टी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे प्लास्टिक, थर्माकॉल, इत्यादीने प्रदूषित होऊ शकतात हे जाणवले. सर्वसाधारण विचार असा असतो कि फक्त एक व्यक्ती हि परिस्थिती सुधारण्यात काय मदत करू शकते? सध्याच्या सरकारने मनावर घेतल्या शिवाय काही होऊ शकणार नाही, पण असे नाही. आपल्या पैकी प्रत्येक जण जबाबदार आहे ह्या परिस्थितीसाठी आणि त्या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी.

सध्याच्या राहणीमाना मुळे म्हणा किंवा जगात होणाऱ्या बदला मुळे किंवा अजून काही कारणा मुळे, पण सद्य परिस्थिती अशी आहे कि आपण एका चक्रव्यूहात अडकलो आहोत असे वाटते. आधी आपण आपल्या साठी प्रश्न निर्माण करतो आणि मग ते सोडवण्यात आपला वेळ, शक्ती, पैसा सगळे खर्च करतो. आता ते कसे? उदाहरणार्थ, आपण आधी कचरा निर्माण करतो आणि मग त्याचे काय करायचे हा विचार. आधी खूप रसायने पाण्यात सोडतो आणि मग नद्या, तलाव कसे वाचवावे हा विचार. खूप पीक वा मोठे फळ येण्या साठी रसायने वापरायची आणि मग जमिनीचा कस कमी झाला म्हणून ओरडायचे आणि "Organic" च्या मागे धावायचे. हे चक्रव्यूह नाही का? मग ह्यातून मार्ग नाही? मार्ग नक्कीच आहे आणि अगदी सोप्पा.  

कर्नाटकमध्ये प्लास्टिक बंदी आहे, म्हणजे कायआपण प्लास्टिक अजिबात वापरायचे नाही असे का? तर उत्तर आहे "नाही". कमी दर्जाचे प्लास्टिक वापरू नये किवा दुसऱ्या सर्वसामान्य शब्दात सांगायचे झाले तर, "प्लास्टिक किवा दुसऱ्या सामग्री पासून बनवलेली कोणतीही गोष्ट जी फक्त एकदा वापरता येते त्या गोष्टींचा वापर बंद करा". सरळ  सांगायचे झाले तर लोकप्रिय "Disposables" चा वापर बंद करा. प्लास्टिक चा वापर बंद करा म्हणजे कागदाच्या गोष्टी चालतात असेही नाही. कागद बनवण्यासाठी मुख्य स्त्रोत म्हणजे वृक्ष, त्यामुळे कागद वापरणे योग्य असे नाही फक्त "दगडापेक्षा वीट मऊ" इतकेच.

सध्याच्या जागरुकता अभियानात विशेष भर दिला जातो तो "3Rs – Reduce, Reuse, Recycle” वर.

Reduce: कमी करा. कचरा कमी करा म्हणजे तो हाताळणे सोपे होईल, ज्या रसायनांची गरज नाही ती वापरू नका म्हणजे त्यामुळे होणारी हानी टाळता येते.
·       साबण हि आपली अगदी सारखी वापरली जाणारी गोष्ट आहे स्वतःसाठी किंवा कपड्यांसाठी किवा भांड्यांसाठी.   ह्याच साबणात ९०% गोष्टी उपयोगाच्या नसतात. सर्व साधारण कल्पना अशी असते कि जास्त फेस झाला म्हणजे साबण छान पण असे अजिबात नाही. शरीर किवा भांडे स्वच्छ होते ते त्यातल्या चागल्या दर्जाच्या "Acids" मुळे आणि फेसामुळे नाही. त्यामुळे शक्यतो जे साबण "Natural" आहेत त्याचा वापर करा
·       प्लास्टिक किंवा कागदापासून बनविलेले "Disposables" वापरू नका.
·       "Online Shopping" सोपे वाटत असले तरी कमी करा कारण त्यामुळे कचरा खूप जास्त प्रमाणात वाढतो.
·       मुलांना "Diapers" च्या ऐवजी "Reusable Diapers" घाला. सध्या खूप सुंदर आणि "Comfortable Diapers" मिळतात. तसेच "Sanitary Napkins" चे सुद्धा आहे.

Reuse: ज्या  वस्तूचा वापर एकाहून जास्त वेळेस आणि एका हून जास्त ठिकाणी होतो तशा वस्तू वापरा.
·       तुम्हाला जर तुमच्या कपड्यांचा कंटाळा आला तर ते फेकण्यापेक्षा,  गरजूंना मदत म्हणून द्या
·       "Online Shopping" मधून आलेली खोकी व्यवस्थित ठेवून ती लोकांना वापरायला द्या
·       खेळणी, पुस्तके कचर्यात फेकण्या पेक्षा ज्यांना गरज आहे त्यांना द्या 

Recycle: एका वस्तूचा एका स्वरूपात वापर करणे अशक्य झाले किंवा कंटाळवाणे झाले तर त्याचे स्वरूप बदला
·       तुम्हाला जर तुमच्या कपड्यांचा कंटाळा आला तर त्यांचे पडदे, पिशव्या, गोधड्या, रुमाल असे बनवा. हे करताना मुलांना मदतीला घ्या म्हणजे त्यांना नवीन शिकवता येते, तुम्हाला मदत होते आणि मुलांबरोबर "Quality Time" घालवल्याचे समाधान असते
·       कचरा त्याच्या प्रकारप्रमाणे वेगळा ठेवा  जेणे करून तो "Recycle" करण्या साठी देता येईल

तशी कोणतीही गोष्ट करणे अवघड आहे असे नाही आणि पर्यावरण मित्र होणे तर अजिबात नाही. फक्त आपल्या "Comfort Zone" मधून बाहेर येणे आणि काही वेगळे करणे हेच खरे आव्हान आहे. मराठी माणूस तसा आव्हानांना कधीच घाबरत नाही पण सुरुवातीलाच मोठे आव्हान घेण्या पेक्षा  लहान लहान बाळ पावले घेऊ आणि हीच आजची बाळ पावले उद्याच्या परिवर्तनाची सुरुवात ठरतीलतर आपण ह्या २०१८ च्या नव वर्षदिनी पुढील संकल्प करू:
. खरेदीला जाताना कापडी पिशवी बरोबर नेणे, एक पिशवी नेहमी कार किवा आपल्या पर्स मध्ये बाळगणे 
. चकचकीत कागदात भेट वस्तू न देणे न घेणे 
. शॉवर वापरण्या पेक्षा आंघोळी साठी बादली वापरा, घरात नळांना "Aerators" लावा म्हणजे पाणी वाहण्याचे प्रमाण कमी होते 
. घरी पार्टी साठी "Reusable Cutlery" वापरा, "Disposables" ला लागणारे पैसे घरी मदतीसाठी असणाऱ्या बाईला द्या ती आनंदाने मदत करेल. सध्या "Stainless Steel" ची पार्टी साठीची भांडी भाड्याने मिळतात आणि ती मंडळी सगळ्या भांड्यांची स्वच्छता पण ठेवतात
. ओल्या कचऱ्याच्या बादलीत प्लास्टिकची पिशवी किंवा कागदाचे अस्तर घालू नका, ओला कचऱ्याची घाण वाटण्याची आवश्यकता नाही कारण ओल्या कचऱ्याची बादली आपल्या जेवणाच्या ताटा सारखी असते जे आपण खातो तेच बादलीत जाते
.  "Online Shopping" टाळा
. नैसर्गिक साबण वापरा त्यामुळे तुमचे स्वाथ्यपाणी ह्यांचे जतन होईल आणि प्रदूषण टळेल. फेस कमी तर तो काढण्यासाठी लागणारे पाणी पण कमी आणि प्रदूषण सुद्धा कमी
. वस्तू विकत घेताना "Reusable Containers" मध्ये घ्या, हॉटेल मध्ये अन्न आणायला जाताना तुमचे डबे घेऊन जा
पुष्पगुच्छ प्लास्टिक मध्ये गुंडाळू नका
१०. सध्या पार्टी साठी साजवणूक सुद्धा भाड्याने मिळते ह्या उपलब्ध सोयींचा वापर करा  
सगळ्यात महत्वाचे म्हणजे लहान मुलांना "Sustainable Lifestyle" चे महत्व पटवून द्या. लहान मुले  कोणत्याही नवीन संकल्पनेची "Best Ambassadors" असतात, ते स्वतः जागरूक झाले म्हणजे ते आजूबाजूच्या लोकांना जागरूक करतील आणि संपूर्ण समाज जागरूक होईल.

२०१८ तुम्हाला, आम्हाला आणि निसर्गाला सुखाचे, समाधानाचे आणि समृद्धीचे जावो!!

- चित्रा सप्रे


  

2 comments:

  1. महत्त्वाचे मुद्दे,अगदी सहजपणे मांडले आहेस. Keep it up

    ReplyDelete
  2. मुद्देसुद लेखन,ऊत्क्रुष्ट

    ReplyDelete