ज्ञानदेवांचा वाङ्मय गणेश
सर्व संतांनी गणेशाची विविधरुपात आराधना केली आहे. ज्ञानदेवांना गणेशाचे वाङ्मयरूप भावले. ज्ञानदेवांचा गणेश ओंकार स्वरूप आहे म्हणून ग्रंथारंभी त्यांनी ओम ह्या एकाक्षर ब्रह्माला आवाहन केले आहे. भारतीय तत्वज्ञानात शब्द हा आकाशाचा गुण मानला जातो. आकाश सर्वव्यापक आहे तसेच शब्दाचेही आहे. ह्या ग्रंथामध्ये आपल्याला शब्दब्रह्माची व्याप्ती अनुभवायला मिळते. श्री गणेशाच्या रूपातून ज्ञानदेवांनी वाङ्मय गणेश साकारला आहे. ज्ञानदेवांना वाङ्मय गणेशाचे अक्षररुपी शरीर नित्य निर्दोषपणे झळकताना दिसते.
स्मृति - गणेशाचे अवयव
काव्यपंक्ती - हावभाव
अठरा पुराणे - रत्नजडीत अलंकार
तत्वसिद्धांत - अलंकारातील रत्ने
शब्दांची जडण घडण - कोंदणे
काव्यप्रबंध- रंगीबेरंगी वस्त्र
काव्यनाटके - घुंगरू
सहा दर्शने - सहा हात
तर्कशास्त्र
-
परशु
न्यायशास्त्र
-
अंकुश
वेदांत रस
-
मोदक
योग्य अयोग्य विवेक - सोंड
पूर्व व उत्तर मीमांसा - दोन्ही कान
द्वैत व अद्वैत मत - गंडस्थळावरील उंचवटे
दशोपनिषद - मुगुट
थोडक्यात ज्ञानदेवांनी वेदादी तत्वज्ञानाची कल्पना गणेशमूर्तीत केली आहे. अशा ह्या वाङ्मय गणेशाचे यथार्थ दर्शन केवळ चर्मचक्षूना घडणार नाही तर त्याला ज्ञानदृष्टीची जोड हवी. शब्दांचे सौंदर्य ज्ञानदेवांनी नमनाच्या ओव्यात प्रकट केले आहे. वाङ्मय गणेशाचे विलोभनीय चित्र आपल्या डोळ्यासमोर रेखाटले आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसांनी ज्ञानवंत व कलावंत होण्यासाठी श्री गणेशाची उपासना केली पाहिजे.
-- मंजिरी सबनीस
छान👌
ReplyDeleteमस्त
ReplyDelete