सुरक्षिततेची भीती


लख्ख दिवसाच्या उजेडात
पाहा रोजच कसे घडतात
विनयभंग नि बलात्कार
खुलेआम भररस्त्यात

निर्मल शिक्षणाच्या दालनात
पाहा प्रकार कसा घडतो
शिक्षणाचा पुजारीच इथे
दानवी अश्लील कृत्ये करतो

जनरक्षणाचे ठेकेदारच इथे
पिडितेस सरेआम बदडतात
यालाच काय ती आजची
न्यायरीत म्हणतात

आज आधुनिक काळातही
ग्रासे स्त्रीला सुरक्षिततेची भीती
साऱ्या या प्रकारांना सांगा
जबाबदार कोण नि किती? 
                         
                         स्वप्नील शंकर नारखेडे


1 comment: