दृष्टीहीनांसाठी वरदान - प्राची गुर्जर

यशोवाणी : दृष्टीहीनांसाठी विनामूल्य ध्वनिमुद्रीत पुस्तकांचे ग्रंथालय


पहिल्यापासून पूर्ण वेळ गृहिणी. हिली १८ वर्षे खाजगी शिकवण्या केल्या. परंतु आपण समाजाचे देणे लागतो, समाजासाठी काहीतरी करावे ही मनात आच होती आणि त्यातून अंधांसाठी/दृष्टीहीनांसाठी काहीतरी करायची इच्छा झाली. त्या वेळी मुंबईत वास्तव्य असल्याने, २००४ साली वरळी येथील NAB संस्थेत जायला सुरुवात केली. त्यासाठी, स्वयंसेवक पात्रतेसाठीचे प्रशिक्षण घेतले. त्याचा एक फायदा झाला की हाती घेतले जाणारे काम किती महत्त्वाचे आहे, किती टि आहे, याची कल्पना आली. त्याचबरोबर, या कामासाठी काय करावे लागणार, याची स्वच्छ कल्पना ली. तिथले प्रशिक्षण संपल्यानंतर, तिथल्याच शिक्षण विभागात, स्वयंसेवक म्हणून कामाला सुरुवात केली. अगदी नोकरी असल्याप्रमाणे, सकाळी .००  ते संध्याकाळी .०० पर्यंत कामाची वेळ ठरवून घेतली.

सर्वात प्रथम, मुलांच्या बुद्धिमत्तेचा अंदाज घेतला आणि त्यांच्या परीक्षेसाठी आपण काय करू शकतो, हे ठरविले. त्या दृष्टीने त्यांच्याकडून अभ्यास करवून घेणे, परीक्षेसाठी त्यांची मानसिक तयारी करून घेणे आणि त्यांना पाठ्यपुस्तक वाचून दाखविणे, या कामांना सुरुवात केली. हळूहळू त्यांच्या बुद्धिमत्तेचा अंदाज यायला लागला, तशी त्यांच्याकडून पेपर्स सोडवून घेण्या सुरुवात केलीतेथील शिक्षकांना पण जी हवी ती मदत करत असे.परीक्षेची तयारी करताना काही अडचणी आल्यामुळे, काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत रायटर म्हणून काम करायला घेतले. याचा फायदा असा झाला, या मुलांच्या ग्रहणशक्तीबाबत काही ठाम ठोकताळे मनाशी बांधता आले. या विद्यार्थ्यांच्या काय गरजा असतात, त्या गरजांच्या अनुरूप आपण त्यांना काय मदत करू शकतो, या सगळ्या बाबींचा नव्याने अंदाज आला. यातूनच पुढे, आयुष्यभर पुरेल असे काम आढळले

आपले विद्यार्थी केवळ अंध आहेत, हे त्यांचे न्यून मानता, त्यातच त्यांच्या गुणांचा विकास करता येणे शक्य आहे, ही शक्यता जाणवली. त्यांना जी पुस्तके अभ्यासक्रमासाठी असतात, ती रेकॉर्ड करून देण्याचे काम मनाला जास्त भावले आणि त्या दृष्टीने ठाम पावले टाकायचे ठरविले. जवळपास एक-दीड र्ष हे काम चालू होते. अचानक मिस्टरांची पुण्याला बदली झाल्याने, मुंबई सोडणे भाग पडलेपुण्याला आल्यावर, पुस्तके रेकॉर्ड करून देण्याचे काम सुरू ठेवले. पुढे तंत्रज्ञान बदलले त्याप्रमाणे, MP3 तंत्रात हेच काम अधिक सुविहीतपणे सुरू केले. आणखी एक फायदा असा झाला की ही पुस्तके संगणकावर कायम स्वरूपात सेव्ह करता आली. याचा दृश्य परिणाम म्हणजे, घरातल्या घरातच, audio library तयार झाली. मुलांना याचा भरपूर फायदा होऊ लागला. अर्थात, इथपर्यंत हे सगळे एकटीच्या भरवशावर केले. परंतु याच सुमारास, आजूबाजूचे समविचारी मित्र संपर्कात आले आणि आमचा एक छोटासा ग्रुप तयार झाला

१०-१२ स्वयंसेवक एकत्र आल्यावर, कामाचा वेग, उरक वाढणे क्रमप्राप्तच होते आणि तसेच झाले. इ.स.२०१०मध्ये आम्ही या ग्रुपचे यशोवाणी  असे नामकरण केले. ग्रुपला आजही कसलेही संस्थात्मक स्वरूप नाही, कुठे कसले registration नाहीआज यशोवाणीसाठी  सुमारे 80 स्वयंसेवक, वाचक म्हणून काम करत आहेत आणि हे सगळे काम विनामूल्य स्वरूपात चालू आहेआज या आमच्या ग्रुपकडे सुमारे 2000 audio books (950 GB) आहेत. या लायब्ररीत, अनेक हिंदी, मराठी तसेच इंग्लिश भाषेतील पुस्तके आहेत. काही उदाहरणे द्यायची झाल्यास, English related (Spoken English Grammar), Computer, MSCIT, MPSC, UPSC, Net-Set, तसेच दहावीची परीक्षा आणि आता तर अगदी Post Graduate exams, Bank exams, General Knowledge study material तसेच इतर अवांतर पुस्तके, कथा, कादंबऱ्या, कविता, आध्यात्मिक पुस्तके, बालकथा, किंवा Medical संबंधी पुस्तकेदेखील अंतर्भूत झाली आहेत



एखादा विद्यार्थी, त्याला हवे ते पुस्तक (अभ्यासाचे किंवा अवांतरदेखील) देतो. जर ते पुस्तक आमच्या लायब्ररीत असेल तर लगेच त्याला, Pen drive, Memory Card किंवा सीडी/डीव्हीडीवर कॉपी करून दिले जाते. बाहेरगावचा विद्यार्थी असेल तर त्याला, त्याच्या पत्त्यावर डीव्हीडी पोस्ट केली जाते. पुस्तक तयार नसेल तर त्याचे रेकॉर्डिंग केले जाते. बाहेरगावचे किंवा परदेशातील स्वयंसेवक असतील तर Scanned Copy Email ने पाठवली जाते. त्यापुढे, स्वयंसेवक स्वतःच्या घरी, सोयीनुसार ते भाग मोठ्याने वाचून, यथास्थित record करून, ते recorded file स्वरूपात सेव्ह करून परत मेल करतात. अशा तऱ्हेने या सगळ्या files एकत्र करून, पुन्हा त्या MP3 मध्ये एकत्रित सेव्ह केल्या जातात. त्यानंतर त्यांची पुस्तकाच्या प्रकरणानुसार अनुक्रमणिका तयार केली जाते आणि ते पुस्तक अखेर, त्या मुलाला पाठविण्यासाठी तयार होते. अर्थात, हे सगळे एकत्रित करण्याचे काम मात्र मी एकट्यानेच करते. रोज ३० ते ४० पाने  recording करणे editing, scanning DVD/CD copy करुन post करणे ही सर्व कामे करण्यात दिवसाचे ९-१० तास सत्कारणी लागतात.

यशोवाणीच्या या प्रकल्पाने, अनेक अंध मित्र/मैत्रिणींना खूपच फायदा होतो. आणि अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया आमच्याकडे वारंवार येत असतात. याचा त्यांना असा फायदा होतो की ते वाचून दाखवणाऱ्यावर अवलंबून राहता, त्याच्या आवडीनुसार, सवडीनुसार ते पुस्तक ऐकू शकतात आणि तदनुषंगाने अभ्यास करू शकतात. या files, मोबाईल किंवा MP3 वर साठवून ठेवल्याने, त्यात एक प्रकारचा सुटसुटीतपणा येतो आणि जरी प्रवास करायची वेळ आली तरी त्यांच्या श्रवणक्रियेत कसलाच अडथळा येत नाही. एक प्रकारे, हे किंडल आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये



केवळ अभ्यासाचीच पुस्तके नव्हे तर अवांतर पुस्तकेसुद्धा मिळत असल्याने त्यांची साहित्याची आवडदेखील जोपासली जाते, वृद्धिंगत होते आणि एकूणच माणूस म्हणून जगण्याची उमेद वाढतेअशा प्रकारच्या वाचनाने, अनेक विद्यार्थी अनेक स्पर्धात्मक परीक्षांमधे उत्तुंग यश प्राप्त करीत आहेत. अनेक मुले बँकेत निवडली गेली आहेत,  काही जण  ऑफिसर परीक्षेची तयारी करीत आहेत, काही नेट-सेट पास होत आहेत. स्वप्ने सत्यात उतरवीत आहेत.

आता या कार्याचा आवाका केवळ महाराष्ट्रापुरता सीमित राहिलेला नसून, राजस्थान, गुजरात या राज्यांतूनदेखील अनेक विद्यार्थी याचा लाभ उठवत आहेत. सीडी/डीव्हीडी विकत घेणे, काही मुलांना MP3 देणे, अगदी गरज पडली तर काही मुलांच्या परीक्षेची, हॉस्टेलची फी भरणे इत्यादी कामेदेखील काही कनवाळू मित्रांच्या साहाय्याने केली जातात; अर्थात हे काम मात्र अल्प प्रमाणात चालते.
WhatsApp वर यशोवाणी शी संलग्न असणाऱ्या विद्यार्थांचा समूह तयार झाला असून, त्याच्यावर General knowledge update चालू असते. तसेच, अंध क्षेत्रातील नवनवीन घडामोडी, नवीन बातम्या, नवीन योजना यांबाबत द्ययावत माहिती ठेवली जाते.  इंग्रजी भाषेची आवड वृद्धिंगत होण्यासाठी, रोज, तिथे एक शब्द ठेवला जातो, ज्यायोगे भाषेबद्दल मुलाच्या मनात आवड निर्माण होईलत्याचबरोबर रोज सकाळी मराठी वृत्तपत्रातील अग्रलेख आणि काही बातम्या रेकॉर्ड रू तिकडे पोस्ट केले जाते

या सगळ्या कार्याभागात, एक बाब अवश्य पाळली जाते आणि ती म्हणजे हे सगळे काम विनामूल्य केले जाते. आम्ही कुणालाही कसलीच फी आकारत नाही, विद्यार्थ्याला हवी तितकी पुस्तके हव्या तितक्या वेळा देतो. बऱ्याच मुलांना पुस्तकाचा लाभ होणार असेल तरच काम केले जातेसे नाही, तर फ़क्त एका मुलाला फायदा होणार असला तरी पुस्तक केले जाते. कोणताही विद्यार्थी विन्मुख जाणार नाही असा कटाक्ष ठेवला आहे.

यशोवाणीचे मुख्य ध्येय हेच आहे, की या चळवळीतून अनेक अंधांना लाभ व्हावा. प्रत्येक शहरात अशी library असावी हे ’यशोवाणी’चे स्वप्न आहे. त्यासाठी, आता प्रत्येक शहरात या कार्याची माहिती पोहोचवण्याचे प्रयत्न चालू आहे. या क्षेत्रात काम करणा‍र्‍या परगावच्या  संस्थांना सर्व पुस्तके hard-disk वर copy करुन दिली आहेत. काही महाविद्यालयांमध्ये पण सर्व data दिला आहे, जेणेकरून जास्तीत जास्त मुलांना याचा लाभ घेता यावा.

पुरस्कार

] लुई ब्रेल अंध-अपंग कल्याण संस्था, पुणे यांच्याकडून समाजभूषण पुरस्कार २०१२

] लुई ब्रेल पुरस्कार - २०१४

] प्रेरणा असोसिएशन फॉर ब्लाइंडकडून २०१५ मध्ये प्रेरणा पुरस्कार

४) १५ ऑगस्ट २०१५ रोजी पुणे महानगरपालिकेतर्फे महापौरांच्या हस्ते सन्मान.

'दीपस्तंभ फाउंडेशन'कडून    दीपस्तंभ पुरस्कार,  १६ जानेवारी २०१६

६) राष्ट्रीय दृष्टिहीन संघ , महाराष्ट्र,  कडून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल 'गौरव ' पुरस्कार १ मे, २०१६

       

3 comments:

  1. वा! फारच स्पृहणीय आणि प्रेरणादायी काम आहे हे!

    ReplyDelete
  2. एकदम मस्तं.. प्राची, तुझ्या ह्या कामाने कित्ती तरी गृहिणींना प्रेरणा मिळाली आहे काहीतरी काम करण्याची..खुप खुप अभिनंदन..

    ReplyDelete
  3. Well done and keep up the good work Prachi. All of us are proud of you.

    ReplyDelete