दि. ७ जुलैला मी पहिल्यांदा ज्ञानेश्वर
महाराज पालखीबरोबर दिंडीचा अनुभव घेतला. IT दिंडी नावाच्या ग्रुपमध्ये आम्ही चौघे, म्हणजे मी, माझी वहिनी, Dr. Rohini
Sathaye, चुलत बहीण (वर्षा) आणि तिचा नवरा (विवेक) रजिस्टर झालो.
पहाटे ३:३० वाजता आम्हाला सहकार नगरच्या रिलॅक्स कॉर्नरवरून पिकअप केलं गेलं. सव्वापाच वाजता आळंदीजवळ असलेल्या ‘‘‘होली बेसिल’’’ नावाच्या एका हॉटेलमध्ये थांबलो.
तिथं नाश्त्याची सोय केली होती
(स्वखर्चाने). रजिस्ट्रेशन हे पुणे ते होली बेसिलपर्यंत ट्रान्सपोर्टचं होतं. मूल्य
400 रुपये.

सकाळी नाश्ता झाल्यावर साधारण 7:45 च्या सुमारास ज्ञानोबा माऊलींची पालखी येताना दिसली. त्याआधी दिंडीत भजनं,
गाणी ह्याचा कार्यक्रम झाला.
माझ्यासमोर एकच प्रश्न होता की आळंदी
ते चतु:शृंगी
चालणं मी पूर्ण करू शकेन का?
पालखीचं दर्शन घेऊन
पुढे चालायला सुरुवात केली.

पाय आता खरोखरी बोलत होते, वेदना खूप होत होत्या पण जिद्द
काही सोडली नव्हती.
पालखी नंतर डेक्कन कॉलेजकडे वळून
संगमवाडीवरून जंगली महाराज रोडवर येणार होती. आम्ही डावीकडे न जाता बॉम्बे sappers
च्या म्हणजे होळकर पुलावरून रेंज हिल्सच्या दिशेने जायचं ठरवलं, कारण तिथूनच आम्हाला परत येताना रिक्षा,
uber, ola मिळणार होत्या. शेवटी 5:15 च्या
सुमार एक रिक्षा मिळाली, जी आम्हाला चौघांना घेऊन जायला तयार नव्हती.
त्यामुळे एकटाच मी त्यात बसलो. बाकीच्यांना एकाच एरिया मध्ये जायचं त्यांनी असल्याने दुसरी रिक्षा केली. रिक्षामध्ये बसल्यावर जे हुश्य झालं ते शब्दात
सांगणं शक्यच नाही.
‘‘पांडुरंग पांडुरंग!’’
श्री नरेन साठये
Good first experience Naren.
ReplyDeleteWish I do this Wari next year