तो आला अन उनाडवारा सैरावैरा पळू लागला
तो आला अन उन्हाला पंखाखाली घेऊन गेला
तो आला अन नवचैतन्याची चाहूल देऊन गेला
तो आला अन कविमनाला साद घालून गेला
तो आला अन उजाड धरतीला हिरवी रंगवून गेला
तो आला अन दुधाच्या सहस्त्रधारा झेपावून गेला
तो आला अन पाऊसवेड्यांना ऋतू हिरवा देऊन गेला
___________________________________
१०" x १२ "
ऑईल पेंटिंग
मंजिरी सबनीस
Khupach chan..मंजिरी पेंटिंग व अंक पण....जाशील तिथे सोने करते..... Keep it up.... Varsha.
ReplyDelete