भारतात स्पोर्ट्सविषयी बोलायचे म्हटले की क्रिकेटबद्दलच
जास्त बोलले जाते. १९९०-२००५ च्या काळात टेनिस आणि सध्या बॅडमिंटन पण लोकप्रिय झाले आहेत. पण क्रिकेट,
टेनिस, बॅडमिंटन हे खेळ पूर्वीसुद्धा इतके
लोकप्रिय होते का?
जर आपण भारतीय क्रीडाजगतातील स्वातंत्र्यपूर्व आणि
स्वातंत्र्यानंतर लगेचची काही वर्षे बघितली तर आपल्याला वेगळेच चित्र दिसेल.
भारताने १९५० आणि १९६० च्या दशकात बऱ्याच खेळांमध्ये चांगली कामगिरी केली आहे, पण त्यात क्रिकेट नव्हते हे विशेष सांगावेसे वाटते.
भारताने १९५० आणि १९६० च्या दशकात बऱ्याच खेळांमध्ये चांगली कामगिरी केली आहे, पण त्यात क्रिकेट नव्हते हे विशेष सांगावेसे वाटते.
आपण हॉकीमध्ये १९२८ सालापासून ते १९८० पर्यंत
जागतिक वर्चस्व गाजवले होते. त्या दरम्यान
झालेल्या १२ ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ८ सुवर्ण, १
रजत आणि २ कांस्य अशी पदके जिंकून हॉकी जगतात निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.
Indian Hockey Team for 1948 Olympics
|
हॉकी आणि फुटबॉलसारख्या सांघिक खेळाबरोबर भारत वैयक्तिक खेळांमध्ये सुद्धा चमकत होता. १९५२ साली हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये श्री. खाशाबा जाधव यांनी कुस्तीच्या स्पर्धेत स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक पदक मिळवले. कांस्य पदक जिंकून जेव्हा ते मुंबई विमानतळावर परतले तेव्हा त्यांच्या स्वागतास फक्त त्यांच्या गावाकडील काही मोजकीच मंडळी उपस्थीत होती.
१९५८
मध्ये साधारण २५ मैलांची इंग्लिश खाडी पोहोणारे पहिले भारतीय म्हणून ओळखले
जाणारे मिहीर सेन यांनी १९६६ साली एका कॅलेंडर वर्षात पाच महासागरांत जलतरण करणारा
जगातील एकमेव मनुष्य होऊन इतिहास रचला होता. यासाठी त्यांचे गिनीज बुकमध्ये नाव
नोंदवले गेले आहे, ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.
मिहीर
सेन यांच्या पाठोपाठ १९५९ साली
आरती साहा ह्या महिलेने इंग्लिश खाडी पोहून पार केली आणि असा विक्रम करणारी पहिली भारतीय महिला
ठरली, ही गोष्ट कुणाला फारशी
माहिती नाही.
Ramnathan Krishnan |
Ramesh Krishnan |
Amritraj Brothers |
भारतीय क्रिकेट टीमने १९८३ चा विश्वचषक आणि १९८५ ची वर्ल्ड चॅम्पिअनशिप जिंकून जागतिक क्रिकेटमध्ये आपले आगमन घोषित केले.
1985 B&H Champions |
1983 World Cup Victory |
त्याच सुमारास घराघरात टी.व्ही. पोहोचले होते. त्यामुळे लोकांना जगभरात घडणाऱ्या मोठ्या स्पर्धांचे
थेट प्रक्षेपण पाहायला मिळत होते. बऱ्याच जणांना ऑलिंपिक स्पर्धा बघण्याचा अनुभव १९८४
साली घेता आला. त्यात पी. टी. उषाची अफलातून कामगिरी आणि एक शतांश सेकंदाने
हुकलेले तिचे पदक ही ठळक वैशिष्ट्ये होती.
१९८२ च्या आशियाई स्पर्धेचे यजमानपद भारताकडे होते. त्या निमित्ताने दिल्ली शहरामध्ये खूप बदल झाले. रस्ते सुधारणा आणि आधुनिक सुविधा असलेली नवीन क्रीडांगणे तयार करण्यात आली. एशियाडच्या निमित्ताने बऱ्याच राज्यांत नवीन आराम बस सेवा सुरू झाल्या, ज्या आजतागायत कार्यरत आहेत.
एकंदरीत स्पर्धेचे आयोजन आणि टी.व्ही. च्या थेट प्रक्षेपणामुळे अंतरराष्ट्रीय क्रीडाजगताबद्दल मोठ्या
प्रमाणावर जनजागृती झाली. कदाचित त्यामुळेच पालक आणि शाळकरी मुले अभ्यासाबरोबर खेळाकडे लक्ष देऊ लागले. या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पुढच्या पिढीवर कसा झाला हे आपण या
लेखाच्या पुढच्या भागात बघू या.
टीप : १९४७ ते १९९९ पर्यंतच्या काळातील सर्व खेळांतील लक्षवेधी कामगिऱ्यांचा उल्लेख करण्याचा प्रयत्न केला आहे. काही खेळाडू
किंवा काही घटना वगळल्या गेल्या असतील तर आम्हाला जरूर कळवा.
Excellent write up Sarang !!
ReplyDeleteसारंग, एकदम छान लेख. ह्यामधल्या काही घटना तर माहितीच नव्हत्या. पुढच्या भागाची वाट पाहात आहे :-)
ReplyDeleteएकदम छान आणि well researched लिहिलंस
ReplyDeleteअसाच चालू ठेव
अन एका पुस्तकात रूपांतर होऊ दे
धन्यवाद.
Deleteसारंग, एकदम छान लेख लिहिला आहेस, पुढच्या लेखची आतुरतेने वाट बघतोय
ReplyDeleteचांगला अभ्यास केला आहेस.
या पुढचा इतिहास सगळ्याना माहीत असल्यामुळे अलीकडच्या खेळाचा सारांश लिहिने कठीण आहे पण तू तो उत्कृष्ट लिहीशील
धन्यवाद. पुढचा भाग interesting करण्याचा प्रयत्न करीन.
DeleteWell done Sarang..keep writing "
ReplyDeleteDeepali Gotadke