गोष्ट एका आजाराची आणि आपल्याच एका मित्राने
त्याच्याशी दिलेल्या झुंजीची. आपला एक मित्र आशीर्वाद आचरेकर! मित्रमंडळातील
अनेकांना तो माहिती आहेच. एक उत्कृष्ट तबलावादक असल्याने, तो आपल्या गाण्याच्या कार्यक्रमात नेहेमी सहभागी व्हायचा. थोडा दूर
राहायला गेल्याने त्याचा मंडळाशी संपर्क कमी झाला. पण तरीही आवर्जून काही ना काही
कारणाने आम्ही संपर्कात होतो. २०१५ च्या सुरवातीला त्याला GBS या आजाराने ग्रासले.
आजारही वेगळा आणि अचानक आलेला.
आशीर्वादने या आजाराला कसे तोंड दिले हे खरोखरच
वाचण्यासारखे आहे. हा सगळा प्रवास त्याच्याच शब्दांत...
।। श्री ।।
।। गजानन प्रसन्न ।।
GBS एक अनुभव
मूळ इंग्रजी लेखक : आशीर्वाद आचरेकर
भाषांतर : सुनीत राजहंस
ट्रान्स्क्रिपशन मदत : अजय चौधरी
प्रकरण १ले : निदान
माझी पत्नी आणि मी ईशा योगा उपासक आहोत. कोईम्बतूरच्या ईशा
योगा केंद्राला भेट देऊन बरेच दिवस झाले होते. त्यामुळे मुलांच्या हिवाळ्याच्या सुट्टीत
कोइम्बतूरला सहकुटुंब जाण्याचा आम्ही बेत केला. गेल्या ६ वर्षांपसून ईशामध्ये
शिकलेली योगासने आणि विविध क्रिया मी नेमाने करत आलो आहे. त्या दरम्यान एक गोष्ट
लक्षात आली की गेल्या ५ वर्षांत मला फक्त एकदा ताप आला आहे. काही अपवाद वगळता - जसे
कनकपुरा रोड वरच्या ‘Fire Flies’ आश्रमात २०१२ मध्ये एका workshop दरम्यान गळ्याला किडा चावल्यामुळे पुरळ आले होते-
मी औषधमुक्त-आरोग्ययुक्त आयुष्य जगत होतो. या धर्तीवर ऑफिसमध्ये काहींना पाठदुखी, काहींना मानदुखी तर काहींना मर्यादा रेषे वरचे cholesterol (मेद) आणि जवळ जवळ
सगळ्यांनाच आळीपाळीने viral ताप अशा विविध व्याधींनी ग्रासले होते. ईशामधून आल्यावर मला माझ्या
मित्रांबरोबर - ईशात शिकलेल्या योग क्रियांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष
सुपरिणामांबद्दल बोलायचे होते.
आम्ही - माझी पत्नी , दोन मुले, चिरंतन (१४) अर्णव (११) आणि मी सर्वांनी ईशा योग सेंटरमध्ये अत्यंत
आनंदात वेळ व्यतीत केला. परत येताना, कोइम्बतुरच्या MTP बस स्थानकावर मला थोडासा ताप जाणवू लागला. दुसऱ्याच दिवशी बंगलोरला
परत आल्यावर - २९ डिसेंबर २०१४ ला - मी तापाने आजारी पडलो. सौ. हर्षदा non-practicing डॉक्टर आहे. तिने
आयुर्वेद औषधी शास्त्राचा integrated (संकीर्ण) अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी मिळवली आहे. मला बारीकसा ताप
येतच होता आणि हर्षदा त्यावर लक्ष ठेऊन paracetamol वगैरे उपायांनी त्याला खाली आणत होती. तापाच्या
तिसऱ्या दिवशी आम्ही घराजवळच्याच ‘शांती हॉस्पिटल व रिसर्च सेंटर (SHRC ), जयनगर, येथे डॉ. नलिनी यांना भेटलो. डॉक्टरांनी तपासून झाल्यावर काही
साधारण antibiotics (प्रतिजैविके) औषधे घ्यायला सांगितली. दोन वर्षांपासून, Broadcom ला नोकरी सुरू केल्यापासून, मी एकही दिवस आजारपणासाठी रजा घेतली नव्हती. पण या
वेळी चांगली ५ दिवस रजा घेउन, सोमवारी मी कामावर रुजू झालो. पण तरीही मला अशक्त वाटत होतं आणि
डाव्या कानात infection झाल्यासारखे ठणकत होते. SHRC च्या ENT (कान-नाक-घसा) तज्ञाने माझ्यावर पुन्हा एकदा antibiotics चा मारा केला. बुधवार ७ जानेवारीला ऑफिसमध्ये
असताना, मी माझ्या वरिष्ठांना सांगितले की मला बरे वाटत नाहीये. नंतर ऑफिसमधल्या लाउंजमध्ये
थोडा वेळ आराम केला. पाठीच्या कण्यामध्ये थोडे अस्वस्थ वाटत होते. दुसऱ्या दिवशी
डॉ. नलिनींकडे जाऊन विचारले की मला इतके अस्वस्थ का वाटत असावे? त्या म्हणाल्या की बी-कॉम्प्लेक्सच्या कमतरतेमुळे असावे. पण हर्षदाने मला अगोदरच
बी-कॉम्प्लेक्सच्या- becosule च्या गोळ्या सुरु केल्या होत्या. डॉ. नलिनींनी त्या चालू ठेवण्याचा
सल्ला दिला.
९ जानेवारीला शुक्रवारी नेहेमीप्रमाणे सकाळी मी गाडीची चावी घेतली.
हर्षदा, मुलं आणि मी अपार्टमेंटच्या लिफ्टमधून तळमजल्यावर आलो. लिफ्टच्या बाहेरच तिथे
छोटीशी इतर पायऱ्यांपेक्षा कमी उंचीची पायरी आहे. ती पायरी उतरताना माझा उजवा पाय लचकला. मी गाडीची
चावी हर्षदाला दिली आणि कसाबसा ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर जाऊन बसलो. मुलांना
शाळेत जाण्यासाठी अपार्टमेंटच्या प्रवेशद्वाराजवळ सोडले, जे F ब्लॉक पासून सुमारे २०० मी. अंतरावर आहे. आज हर्षदा गाडी चालवत असल्यामुळे मी खाली उतरलो, मुलांना गेटबाहेर सोडले. गाडीकडे परत येताना मला जाणवले की माझी हालचाल
नेहमीपेक्षा मंदावली आहे, मी थोडा थबकत थबकत चालत होतो. हर्षदा गाडीच्या बाहेर आली आणि गेटपासून
गाडीपर्यंत माझ्याबरोबर चालत परत आली. मी ज्या रीतीने पायरीवर कोलमडलो ते तिला अस्वस्थ
करून गेले. तिने मला स्पष्टच सांगितले की - कानाच्या infection मुळे जर असे झाले असते तर तोल वेगळ्या तऱ्हेने
गेला असता. आम्ही घरी परत गेल्यावर सुमारे ७ वाजता तिने आमच्या स्नेही आणि स्त्री
रोग तज्ञ डॉ. विजया शेरबेत यांना फोन केला. हर्षदाकडून गेल्या दोन आठवड्यांचा
घटनाक्रम काळजीपूर्वक ऐकल्यावर डॉ. विजया यांनी अचूक निदान केले आणि सांगितले, “याला GBS म्हणतात. आशीर्वादला ताबडतोब ICU मध्ये दाखल होण्याची गरज आहे. त्याला लगेच admit कर. GBS म्हणजे गुलिअन बारी सिन्ड्रोम!” आम्हाला GBS ची काहीच माहिती नव्हती म्हणून आम्ही गुगल केली. हर्षदा म्हणाली, “डॉ. विजयाचे निदान खरे असू नये. थकवा
बी-कॉम्प्लेक्सच्या कमतरतेमुळेच असावा. GBS मुळे नाही.” तरी तिने मला विचारले, की रमाकांतला (माझे भाऊजी) आधी GBS झाला होता का? मी आठवून ठामपणे सांगितले, “त्याला GBS नाही तर SJS (स्टीवन जॉन्सन सिन्ड्रोम) झाला होता, जो की औषधांच्या उलट सुलट प्रतिक्रियांमुळे (contra medication) मुळे होतो. नाश्ता आणि
चहा कसाबसा घशाखाली ढकलत असतानाच मी डॉ. नलिनी यांची १०:३०वाजताची appointment घेतली. SHRC ला आम्ही १०:२५ वाजता
पोहोचलो. कारमधून बाहेर पडणेसुद्धा मला मुश्किल झाले होते. कसाबसा कारच्या बाहेर
उतरलो. हर्षदा मला धरण्यासाठी उतरणार होती, पण मी सांगितले, “तू कार पार्क करून ये. तोपर्यंत मी डॉक्टरांकडे
पोहोचतो.” SHRC च्या security ने मला डॉक्टरांकडे नेले. तोपर्यंत हर्षदा कार पार्क करून
डॉक्टरांच्या केबिनमध्ये पोहोचली. केवळ माझ्या चालण्याच्या पद्धतीकडे बघून डॉक्टर
नलिनी म्हणाल्या, “हा GBS आहे, गुलिअन बारी सिन्ड्रोम! तू ताबडतोब आशीर्वादला ICU मध्ये भरती करायला पाहिजेस.” त्यांनी आम्हाला ३ हॉस्पिटल्स सुचवली. तिन्ही
बन्नेरघट्टा रोड, बंगलोर इथे होती. त्यापैकी सागर हॉस्पिटल येण्याजाण्याच्या गैरसोयीचे म्हणून आम्ही
नाकारले. काही चौकशी करून डॉ. नलिनींना समजले की अपोलो हॉस्पिटलचे neuro physician बंगलोरमध्ये नाहीत. मग
त्यांनी त्यांच्या व्यावसायिक मैत्रीतील, फोर्टिस हॉस्पिटलच्या डॉ.शीला चक्रवर्ती यांना विचारले की त्या माझी GBS ची केस घेतील का ? त्यांचा होकार मिळाल्यावर डॉ. नलिनी यांनी डॉ. शीला
यांना देण्यासाठी मला शिफारसपत्र दिले. ते पत्र घेऊन आम्ही फोर्टिस हॉस्पिटल कडे
निघालो. पण डॉ. नलिनी यांच्या रूममधून बाहेर पडताच माझा डावा पाय कोलमडला. मला उभे राहता येईना. तेथील सेवक वर्गाने मला
व्हीलचेअरवर बसवले आणि कारपर्यंत सोडले. दोन जणांनी मिळून मला ड्रायव्हरच्या
बाजूच्या सीट \वर बसवले. हर्षदा आणि माझा ‘प्रोजेक्ट GBS’ सुरू झाला होता. SHRC तून फोर्टिसमध्ये जाताजाताच मी मला GBS झाला आहे असा sms तीन जणांना पाठवला. एक CFL चे शिक्षक आणि माझे २ मित्र- अजय आणि भूषण - इंजिनीरिंगच्या
दिवसापासूनचे माझे सोबती! CFL म्हणजे ‘सेन्टर
फॉर लर्निंग’ - एक छोटी शाळा जिथे माझी मुले शिकतात. एकूण पसारा कमी असल्यामुळे
शिक्षक व पालक एकमेकांना चांगले ओळखतात. डॉ. विजया शेरबेत CFL पालक आहेत.
क्रमशः
Hmm - Interesting. Looking forward to next one !!
ReplyDeleteThanks Abhijit
ReplyDeleteAshirwad Bhaiya. Thanks for sharing your experience and update our knowledge about GBS. This was very worst news for us when we heard this about you. And also Happy to see you now perfectly alright. Thanks for God and people who were there with you in your critical period.
ReplyDelete