सर्वांची मैत्रीण - भाग्यश्री कुलकर्णी-करकमकर

नमस्कार

मी भाग्यश्री कुलकर्णी-करकमकर.  मैत्रीण.कॉम ह्या वेबसाईटची संस्थापिका.
मैत्रीण.कॉमची tagline आहे, मराठी स्त्रियांची Online Community… मैत्रीण.कॉम हा जगभरातील मराठी स्त्रियांना घट्ट जोडणारा दुवा आहे.

थोडी माझी पार्श्वभूमी. मी मूळची पुण्याची. माझे शालेय शिक्षण झाले अभिनव मराठी सौ. विमलाबाई गरवारे ह्या शाळांमधून. पुढे मी MIT Women’s college मधून Computer Engineering केले. शिक्षण झाल्यावर, थोड्याबहुत प्रोजेक्टवर काम केल्यानंतर मी लग्न करून कॅलिफोर्नियात लॉस एंजिलीस येथे स्थायिक झाले.  Programmer Analyst म्हणून काही काळ काम केले. नंतर रिकामा वेळ असताना, वेबसाईटची जडणघडण’ हा माझा आवडीचा विषय असायचा. विविध content management systems तसेच विविध internet technologies हाताळून पाहिल्या. परंतु नक्की कशाची वेबसाईट काढणार हा मुद्दा अनुत्तरीतच असल्याने त्याचे पुढे काही झाले नाही. नंतर माझ्या मुलाच्या आगमनाची चाहूल लागली. तेव्हापासून माझा मुलगा नील हा माझा फुलटाईम जॉब आहे. :)

मात्र ह्या सर्व काळात आपणकाहीतरी’ ‘वेगळेकेले पाहिजे ही तगमग सतत जाणवत असे. म्हणजे नक्की काय करावे हे उमगल्याने बरेच दिवस, महिने असेच गेले. एकीकडे मराठी आंतरजालावर माझा वावर नियमित होता. काही वेबसाईटवर स्त्रियांसाठी खास असे भाग चालू झाले होते. एका मैत्रिणीशी बोलताना जाणवले, की मराठी आंतरजालावर स्त्रियांसाठी खास अशी वेबसाईट नाही आहे. इंग्रजी भाषेत, भारतीय स्त्रियांसाठी तसेच पाश्चात्त्य जगातही स्त्रियांसाठी वेबसाईटस भरपूर आहेत असे मार्केट स्टडी करता लक्षात आले. मग जर मराठीत अशी वेबसाईट नसेल, तर ती आपणच का काढू नये, ह्या माझ्या मृदुला गोरे नावाच्या लंडनस्थित, मैत्रिणीचा सवाल मला वेगळीच दिशा देऊन गेलायोगायोगाने माझ्या रिकाम्या वेळात केलेल्या वेबसाईट डेव्हलपमेंट उद्योगांचा ह्या वेळेस उपयोग होणार होता. हे सर्व झाले जानेवारी २०१५ च्या शेवटाला. आणि थोड्याच दिवसांत; मृदुला आणि दुसरी मैत्रीण श्रद्धा मोरे, ह्या दोघींच्या अमूल्य  मदतीने   फेब्रुवारी २०१५ ला  मैत्रीण.कॉम उदयास आली. मैत्रीण.कॉमचे नक्की धोरण काय असावे, ही वेबसाईट काढण्यामागे आपण नक्की काय विचार करत आहोत, पुढील वाटचाल कशी करणार आहोत इत्यादी विषयांवर आमच्या भरपूर चर्चा व्हायच्या त्यातून हळूहळू मैत्रीण.कॉमचे स्वरूप आम्हाला उमगत गेले. टेक्निकल बाबी मी स्वत: पाहात असल्याने माझ्यासाठी हा खूप समाधानकारक प्रोजेक्ट होत होता.

हे काम चालू करत असताना एक लक्षात आले-  बर्याच मैत्रिणींना हा प्रश्न पडत होता की आजकालच्या समानतेच्या जमान्यात आपण फक्त स्त्रियांसाठी वेबसाईट का बरं काढत आहोत? हे एक पाऊल मागे जाणे नाही का? मला तसे अजिबात वाटत नाही. आजच्या जमान्यात मित्रमैत्रिणी असणे हे एकदमच नॉर्मल आहे. तरीदेखील आपल्या खास मैत्रिणी जमल्यावर, गर्ल्स नाईट आउटला मजा येतेच ना अजूनही? मैत्रीण.कॉमचे स्वरूप इतकेच मर्यादित नाहीये अर्थातच.

महाराष्ट्र राज्य खूप मोठे आहे, तसेच इतर राज्यांतील मराठी भाषिकदेखील इतक्या वेगवेगळ्या ठिकाणांहून येतात. त्यात्या शहरातील, गावातील रितीभाती वेगळ्या, त्यांच्या बोलीभाषा वेगळ्या! त्यांचे खाण्याचे पदार्थ वेगवेगळ्या चवींचे. ह्या सर्व ठिकाणच्या मराठी स्त्रिया एके ठिकाणी (म्हणजे मैत्रीण.कॉमवर!) आल्यावर  एकमेकींना समजून  घेणे, प्रादेशिक फरक जाणून घेणे हे फार सुंदर असते. मला स्वत:ला कायम पुण्यातीलच वातावरण, खाणेपिणे ओळखीचे. पुण्याची ती ठरावीक भाषाच ओळखीची. पण मैत्रीण.कॉममुळे माझा ज्ञाना चा परीघ खूप वाढला. स्त्रियांचे प्रश्न जाणून घ्यायचे असतील तर सर्वप्रथम आपण सर्व प्रदेशातील स्त्रियांना समजून घेतले पाहिजे. मराठी माणसाच्या बाबतीत  अन्न साहित्य ह्या दोन गोष्टींनी लगेच जवळीक साधली जाते. जेव्हा असा सुरेख अनुबंध तयार होतो तेव्हाच आपण आपले काही प्रॉब्लेम्स चार लोकांशी शेअर करू शकतो.; आणि तेव्हाच आपल्याला जास्त खोलात जाऊन अडचणींवर मात करता येते.

मैत्रीण.कॉम चालू करण्यामागे स्त्रियांसाठीचा खास असा एक आधारगट असावा असे खूप मनात होते. एखादी स्त्री काही अडचणीमधून जात असेल तर तिच्यासाठी मदतीचा हात पुढे करता यावा असे वाटत होते. अडचणी आल्या तरी बऱ्याचदा मार्ग माहीत असतो. हवा असतो तो एकलिसनिंग इअर’! तुम्ही जी अडचण फेस करत आहात तिच्यामधून इतर मैत्रिणीदेखील गेल्या आहेत, किंवा तुम्ही जे मार्ग शोधात आहात तो बरोबर आहे, पुढे जाउन सगळे ठीक होईल हे सांगणारे कोणीतरी हवे असतेमैत्रीण.कॉम ही अपेक्षा नक्कीच पुरी करते. त्याचबरोबर एखाद्या शहरातील माहिती (रिसोर्सेस) जसे काही डॉक्टर्स, वकील इत्यादी माहिती तुम्हाला मैत्रीण.कॉमवर जरूर मिळेल. बऱ्याच अंशी मैत्रीण.कॉम ही काउन्सेलरसारखी ठरते. तुमचे प्रॉब्लेम्स ऐकणारा एककान' तुम्हाला हवा असतो, तो कान मैत्रीण.कॉम नक्कीच देते.


मैत्रीण.कॉमवर तुम्ही आलात की तुम्हाला काय दिसेल?

 हे मैत्रीण.कॉमचे होमपेज. तुम्ही सदस्यत्व घेतले नसले तरी तुम्हाला मैत्रीण.कॉमवरील सार्वजनिक लिखाण जरूर वाचता येईलत्यात विविध प्रकारचे गद्य साहित्य (कथा,ललित, स्फुट), कविता, पुस्तके, चित्रपट विषयक लेखन आणि विविध ठिकाणच्या भटकंतीबद्दल मैत्रीणच्या सदस्यांनी लिहिलेले लेख तुम्हाला वाचता येतील.

मात्र मैत्रीणचे खरे स्वरूप जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही सदस्यत्व घेणे आवश्यक आहे. नवे सदस्यत्व येथे घेता येईल : https://www.maitrin.com/user/register
मैत्रीणच्या खाजगी विभागांबद्दल बोलण्याआधी मैत्रीणच्या सदस्यत्व घेण्याच्या प्रोसेसबद्दल मी शब्द बोलते. मैत्रीण ही वेबसाईट केवळ स्त्रियांकरिता बनवली गेली आहे. त्यामुळे नवे सदस्य जेव्हा साईटवर रजिस्टर करतात, तेव्हा त्यांच्यासाठी एक व्हेरिफिकेशन टीम / स्वागत समिती नेमली आहे. आमची टीम मेंबर नव्या सदस्येला फोन करून तिच्याशी गप्पा मारते. मैत्रीणबद्दल कुठून कळले, तिच्या आवडीनिवडी काय, अशा ओळख करून घेण्याच्या निमित्ताने गप्पा झाल्यावर मैत्रीणवरच्या वावराचे संकेत सांगते. ही वेबसाईट केवळ स्त्रियांकरता असल्याने येथील माहितीचा, सदस्यांच्या माहितीचा कोणत्याही प्रकारे गैरवापर होऊ नये योग्य ती गोपनीयता बाळगावी हे जरूर सांगितले जाते. मैत्रीण.कॉमच्या स्वरूपामुळे -  आधारगट असल्यामुळे -  बऱ्याच मैत्रिणी अगदी मनमोकळेपणी आपल्या मनातील लिहीत असतात. त्यामुळे ही सर्व खबरदारी घेणे आमचे कर्तव्य आहे.


सार्वजनिक विभागाखेरीजही मैत्रीणवर खूप काय काय घडत असते. सदस्यांची रोज मैत्रीणला भेट देऊन देऊन इतर सदस्यांबरोबर ओळख होत जाते, मैत्रीत रूपांतर होते. रोज जेवायला काय केले इत्यादी हलक्याफुलक्या गप्पांपासून चालू घडामोडी, राजकारणापर्यंत कितीतरी विषयांवर गप्पा होत असतात. ‘दैनंदिनी' नावाच्या धाग्यावर काही मैत्रिणी त्यांचा दिवस कसा गेला हे अतिशय सुंदर लिहितात. रोजच्या त्या दैनंदिनी वाचणे हे मनाला खूप भिडणारे असते. मैत्रीण.कॉमचा खरा आधार मिळतो तो  नवोदित मातांना. गर्भारपणापासून ते बाळ मोठे होत असतानाच्या काळात अनुभवी मातांचा त्यांना भरपूरच आधार मिळतोत्याचबरोबर खास स्त्रियांचे मानसिक-शारीरिक आरोग्य, ह्या विषयांवर देखील मैत्रीण.कॉमवर भरपूर लेखमालिका, चर्चा होत असतात. कितीतरी मैत्रिणींनी इतर मैत्रिणींचा आदर्श ठेऊन आहारपद्धती बदलली, उत्तम लाइफस्टाइल अंगिकारली, वजन कमी करून दाखवले. मैत्रीण.कॉमवर असलेल्या सदस्यांपैकी काही सदस्या डॉक्टर, डाएटिशिअन किंवा न्युट्रिशन ह्या विषयात काम करणाऱ्या असल्याने त्यांच्याकडून उत्तम मार्गदर्शन मिळत राहते.

मैत्रीण.कॉम बद्दल मैत्रिणी काय म्हणतात?


मैत्रीणची खासियत म्हणजे मैत्रीण युनिव्हर्सिटी! मैत्रीणच्या पहिल्या वाढदिवसाला आम्ही ह्या प्रोजेक्टचा शुभारंभ केला.
जे जे आपणासि ठावे| ते ते इतरांसि शिकवावे| शहाणे करून सोडावे सकाळ जन||
ह्या श्री रामदासस्वामींच्या उक्तीनुसार मैत्रीण.कॉमच्या सदस्यांकडे जे जे अंगभूत गुण, कला, स्किल्स असतील ती त्यांनी इतर सदस्यांना शिकवावी ह्या कल्पनेतून ही युनिव्हर्सिटी सुरू झाली.
प्रथम कोर्स घेतला गेला, क्रोशा विणकाम. त्या कोर्सला मिळालेल्या उत्तम प्रतिसादाने मैत्रीण युनिव्हर्सिटीची मुहूर्तमेढ झाली. ४० सदस्यांनी ह्या कोर्समध्ये भाग घेतला १६ जणींनी कोर्स अथपासून इतिपर्यंत पूर्ण करून त्या कोर्सचे प्रशस्तीपत्र पटकावले. त्यानंतर बेकिंग, क्रिएटिव्ह रायटींग (लिहावे कसे?), जलरंग कार्यशाळा hand embroidery हे कोर्सेस आत्तापर्यंत घेतले गेले आहेत. याचबरोबर मे महिन्याच्या सुट्टीत मैत्रीण सदस्यांच्या घरातील ज्युनिअर मेम्बर्सनी (पाल्यांनी) विविध  कोर्सेस शिकवले. संस्कारभारती रांगोळी, Loom Bands , Nail Art, Tee Shirt Painting इत्यादी ज्युनिअर मेम्बर्सनी शिकवलेले कोर्सेस मैत्रीण सदस्यांनीदेखील आवडीने पूर्ण केले.

याचबरोबर मैत्रीणावर त्या त्या ऑकेजननुसार विविध उपक्रम घेतले जातात. त्याला इतका उदंड प्रतिसाद मिळतो की अक्षरश: सणासारखे वातावरण असते.
गेल्याच आठवड्यात मैत्रीण.कॉमचा दुसरा वाढदिवस झाला. ( फेब्रुवारी). या वेळेस आम्ही पत्रलेखनाचा अभिनव उपक्रम घेतला. (पत्र तुझे ते येता अवचितमैत्रीण.कॉमवरील सदस्यांनी त्यांच्या आवडत्या सदस्यांना त्रं लिहून मनातील सारे सुंदर शब्दांत मांडले. मात्र कोणाला पत्र लिहिले आहे त्याचा पत्ता लागू दिला नाही. ते इतर सदस्यांनी ओळखून दाखवायचे होते. इतके मजेचे वातावरण निर्माण झाले होते! मजेचे, त्याचबरोबर भावूक. :)
    ह्या पत्रालेखनाबरोबरच मैत्रीणने एक सामाजिक उपक्रम वेळेस आयोजित केला आहे. मैत्र'. आसामातील कॉलेजमधील विद्यार्थांना इंग्रजी संभाषणाचा सराव होण्याकरिता हा उपक्रम आयोजित केला आहे. मैत्रीण सदस्या फोन करून, नेमून दिलेल्या विद्यार्थ्याशी संवाद साधतील, जेणेकरून रोजच्या वापरातील इंग्रजी संभाषणाची सवय त्या विद्यार्थ्यांना होईल.
    आत्तापर्यंत मैत्रीणवर घेतले गेलेले उपक्रम असेच विशेष आहेत. डिसेंबरमध्ये आम्हीसीक्रेट सान्ता हा उपक्रम घेतला. त्यात भाग घेतलेल्या प्रत्येक सदस्येला एक एक सान्ता सदस्य नेमली होती, जिचे नाव सीक्रेट ठेवले होते. तिने पाठवलेले गिफ्ट, पत्र, यामुळे पूर्ण डिसेंबर महिना इतका सुरेख, सरप्राईझ मिळाल्याच्या आनंदात  न्हाउन निघाला!
      मराठी भाषा दिनाला आम्ही इपिगो' नावाचा उपक्रम केला. इपिगो म्हणजे इटुकली पिटुकली गोष्ट’! कमीत कमी शब्दांत दिलेल्या कोणत्याही गंमतशीर शब्दाला धरून सदस्यांनी इतके सुरेख लिहून दाखवले!
     रंग खेळू चला म्हणजेच, ईट युअर कलर्स हीदेखील अभिनव कल्पना होती, ज्याच्यामुळे भरपूर रंगीबेरंगी पाककृती तयार झाल्या!
    दर महिला दिनालामी ही अशी' हा एक इंटरेस्टिंग क्विझचा उपक्रम घेतला जातो. ह्यात एका ओळीत उत्तर असणारे किंवा भरपूर विचार करून लिहायला लावणारे बरेच प्रश्न मैत्रीण सदस्यांना विचारले जातात. ती उत्तरे देताना प्रत्येक सदस्य रंगून जाते त्यात; कोणी आत्मपरीक्षण करते, तर कोणाच्या काही पर्सनल अडचणी असतील तर त्या कोणी  दोन घटका विसरते.

मैत्रीण.कॉम र्षांपूर्वी, म्हणजेच फेब्रुवारी २०१५ ला सुरू झाली. तेव्हापासून आजवर मैत्रीणला मिलिअन पेजव्ह्यूज मिळाले आहेत. ह्या वेबसाईटला ३२,०००+ वाचक आहेत; तर रजिस्टर केलेल्या सदस्यांची संख्या ६७१ आहे. भारतातून साहजिकच सर्वात जास्त वाचक/सदस्य मिळतात; मात्र ह्याचबरोबर युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंग्डम, युनायटेड अरब एमिरेट्स, सिंगापोर, ऑस्ट्रेलिया, जपान, इस्रायेल, जर्मनी, स्वीडन, इंडोनेशिया, बहारेन इत्यादी ठिकाणीही मैत्रीण.कॉमचे सदस्य/वाचक आहेत. लवकरच पूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात मैत्रीणचे नाव होईल, मराठी स्त्रियांसाठी एक परिपूर्ण आधारगट बनेल अशी महत्त्वाकांक्षा तसेच  खात्री बाळगून मी तुमचा निरोप घेते. आणि तुम्हाला मैत्रीण.कॉमवर येण्याचे आग्रहाचे आमंत्रणही देते.

जरूर भेट द्या- https://www.maitrin.com/ ( मराठी स्त्रियांची Online Community… )





14 comments:

  1. अभिनंदन :) मस्त, मनमोकळी आणि विश्वासार्ह मैत्रीण मिळवून दिल्याबद्दल भाग्यश्रीचे खूप खूप धन्यवाद! मैत्रीणच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा __/\__
    मित्रमंडळ बंगळुरु कट्टाते ही धन्यवाद!

    ReplyDelete
  2. Khupch masta kalpana...mala member vhayala nakkich aavdel :)

    ReplyDelete
  3. Ek agala vegla upkram suru kelyabaddal bhagyashiche manapasun abhinandan
    Anek ashirvad
    Ani pudhil vatchalisathi anek shubhecha

    ReplyDelete
  4. वाह! मस्त वाटलं हे वाचून. मैत्रीण.कॉम खूप मोठी होवो. प्राउड ऑफ यु भाग्यश्री.

    ReplyDelete
  5. खूप छान मनोगत..
    भाग्यश्री आणि मैत्रिण.कॉमला अनेकानेक शुभेच्छा!

    ReplyDelete
  6. Congratulations Bhagyashree!#

    ReplyDelete
  7. मस्त...

    मैत्रिण.कॉमला अनेकानेक शुभेच्छा!

    ReplyDelete
  8. मस्त वाटलं वाचून. मैत्रीणच्या पुढच्या वाटचालीकरता मनापासून भरपूर शुभेच्छा!

    ReplyDelete
  9. Tried to join but could not register. Pl help.

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you Priya. We have received your new account request. As I said in the article, someone from welcome team will call you soon and then your account will be approved. The process usually takes week's time depending on the availability of team members. Thank you for your patience.

      Delete