रेसिपी : कूकीज आणि मफीन्स

डिसेंबर महिना आला की चाहूल लागते ख्रिसमसची आणि ख्रिसमस म्हटले की केक्स, मफीन्स,कूकीज ची नुसती रेलचेल. आजकाल बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या कूकीज, मफीन्स आपल्याला पाहायला मिळतात. परंतु घरचे ते घरचे असे पूर्वजांनी म्हटले आहे. म्हणून मी आपल्यासाठी घेऊन आली आहे- ख्रिसमस स्पेशल  केशर पिस्ता कूकीज आणि चोको चिप्स मफीन्स.

केशर पिस्ता कूकीज
साहित्य: १८० ग्राम गव्हाचे पीठ , १०० ग्राम पिठी साखर, १०० ग्राम बटर, १०-१५ पिस्ते, १०-१२ केशराच्या काड्या, ३-४ विलायची, २ टेबल स्पून दूध
कृती: प्रथम दूध घेऊन  ते कोमट करून त्यात केशर ३० मिनटे भिजत घालावे. त्यानंतर बटर घेऊन त्यात पिठीसाखर घालून ते क्रीम करावे. आता ३-४ विलायची कुटून घेऊन १०-१५ पिस्ते ही ओबडधोबड असे करुन घ्यावेत. भिजत घातलेले केशर चांगले कुस्करून किंवा दुधात वाटून घ्यावे. त्याचा छान पिवळा रंग येतो. हे दुधात वाटलेले केशर नंतर क्रीम केलेल्या मिश्रणात घालावे  तसेच वेलची पूड घालावी. त्यात गव्हाचे पीठ घालावे हलकेसे मळून घ्यावे. हे मिश्रण कणके सारखे होईल. मिश्रणाचा गोळा करताना गरज वाटल्यास थोडेसे  दुध घालावे.


गव्हाचे पीठ आणि ड्राय फ्रुटस वापरल्याने कूकीज एकदम पौष्टिक होतात. लहान मुलांना खाऊ म्हणून किंवा किट्टीपार्टी साठी बनवता येतात.  

ह्या मिश्रणाचा गोळा करून त्याची मोठी पोळी लाटून घ्यावी. त्यावर पिस्त्याची भरड पेरून पुन्हा एकदा  हलक्या हाताने लाटावे. नंतर कुकीकटर ने हव्या त्या आकारचे कूकीज कट करावेत. मी इथे हार्ट शेप कूकीज केले आहेत. हे सर्व शेप्स एका बेकिंग ट्रे मधे काढावेत.
आता मायक्रोवेवव्ह ओव्हन  १८० डिग्री सेंटीग्रेडला प्रीहीट करून त्यात बेकिंग ट्रे ठेऊन ७ मिनिटे भाजावीत. छान खरपूस पिवळ्या रंगाची हार्ट शेप कूकीज तयार.



चोको चिप मफीन्स
साहित्य: १५० ग्राम मैदा , १०० ग्राम पिठी साखर, १०० ग्राम बटर, १ अंडे, वॅनिला एस्सेन्स, १०० ग्राम चोको चिप्स, १/२ टी स्पून बेकिंग पावडर आणि १/८ टी स्पून बेकिंग सोडा.
कृती: प्रथम एका पसरट भांड्यात बटर घ्यावे, ते रूम temperature ला असावे. त्यात पिठी साखर खालून छान क्रीम करावे. नंतर अंड एका दुसऱ्या भांड्यात फेटून घ्यावे व हळूहळू क्रीम केलेल्या मिश्रणात घालावे म्हणजे व्यवस्तिथ मिक्स होईल. ८-१० थेम्ब वॅनिला एस्सेन्स घालावे व परत एकदा व्यवस्थित मिक्स करावे. आता मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा चाळणीने चाळुन घ्यावा. नंतर हे सर्व कोरडे मिश्रण क्रीम केलेल्या मिश्रणात घालावे व छान मिक्स करावे. मिश्रण इडली पीठासारखे पातळ असावे. ह्या मिश्रणात चोको चिप्स घालावेत व पुन्हा एकदा छान मिक्स करावे.

आजकाल बाजारात टेफ्लॉन किंवा सिलिकॉन कोटींग चे मफीन मोल्ड मिळतात. ह्याला ग्रीसिंग करायची आवश्यकता नसते. पेपर कप चे द्रोण मफीन मोल्ड मध्ये ठेऊन हे मिश्रण मध्ये एक एक चमचा एका मोल्ड मध्ये घालावे. आणि त्यावर पुन्हा एकदा चोको चिप्स घालावेत.

आता मायक्रोवेव्ह  १८० डिग्री सेंटीग्रेडला प्रीहीट करून मफीन मोल्ड ठेऊन १२ मिनिटं बेक करावेत. छान डेलिशिअस मफीन तयार.आजकाल बाजारात टेफ्लॉन किंवा सिलिकॉन कोटींग चे मफीन मोल्ड मिळतात. ह्याला ग्रीसिंग करायची आवश्यकता नसते. पेपर कप चे द्रोण मफीन मोल्ड मध्ये ठेऊन हे मिश्रण मध्ये एक एक चमचा एका मोल्ड मध्ये घालावे. आणि त्यावर पुन्हा एकदा चोको चिप्स घालावेत.आता मायक्रोवेव्ह १८० डिग्री सेंटीग्रेडला प्रीहीट करून मफीन मोल्ड ठेऊन १२ मिनिटं बेक करावेत. छान डेलिशिअस मफीन तयार. 


-- राधिका बागुल

1 comment:

  1. Mastach!!! Abhinandan.... Me nakki try karun baghen... :-)

    ReplyDelete