नसे कोणा आमंत्रण |
नसे कोणा मानधन |
प्रेमाचा शिस्तीचा सोहळा | पंढरीची वारी ||१||
वैष्णवांचा
महामेळा | परंपरा पुरातन |
भक्ताच्या
प्रेमाची अनुभूती | पंढरीची वारी ||२||
नैतिकतेची
शाळा | अनुभवावे भावदर्शन |
अखंड
हरिनामाचा गजर | पंढरीची वारी ||३||
टाळ-पखवाजाचा
गजर | करतो आश्वस्त मन |
नवीन
बळ-प्रेम-सामर्थ्य देते | पंढरीची वारी ||४||
भेटण्या
सावळ्या विठ्ठला | लेकुरे आतुर आणि लीन |
विवेकी
उन्नत वाटचाल | पंढरीची वारी ||५||
भक्तीच्या महाद्वारात वारकरी | घाली फुगडी-रिंगण |
होऊन आनंदघन करी | पंढरीची वारी ||६||
माणसात
देव पहा | ठेवा समाजाचे भान |
शिकवते
कराया विश्व आपुले | पंढरीची वारी ||७||
ज्ञाना-नामा-तुका-एकाची
| खांद्यावरी पालखी|
मी-पणा सोडायची शिकवण देते | पंढरीची वारी ||८||
साऱ्या
संतांचे अस्तित्व | त्यांच्या जीवनमूल्यात
|
रुजवायचे प्रतिवर्षी | सफल कराया पंढरीची वारी ||९||
शिकवूनी
मानवतेचा धर्म | एकात्मतेची दिंडी निघाली |
अदवैतता
कृतीत आणली | करुनी पंढरीची वारी ||१०||
-----------------------------------------------------------------------------
मंजिरी विवेक सबनीस
मंजिरी विवेक सबनीस
मस्त. वारीचे तंतोतंत वर्णन
ReplyDeleteखूपच छान!!
ReplyDeleteDhanyawad Swati and Rashmi.
ReplyDelete