मित्रांनो...
लहान असो, मोठा असो गणपती बाप्पा आपल्याला सगळ्यांनाच आवडतो. तो घरी
येणार असला कि जो आनंद होतो तो अवर्णनीय असतो. आणि या वर्षी विशेष आनंद होतोय कारण
दारच्या फुलांनी पूजा करावी तशी माझं एक गाणं मी त्याच्या चरणी ठेवू शकले. माझीच
मैत्रिण (कै. स्मिता तळाशीकर) हिने हे गाणं अतिशय सुंदर लिहिलंय आणि गाण्यात
सहभागी असलेल्या प्रत्येकानेच अप्रतिम गायलं आहे... खास करून बच्चे कंपनी तर
धम्माल गायली आहे.
अजून घरोघरी बाप्पा आहेत...
तेंव्हा सर्वांनी आपापल्या घरी हे गाणं जरूर वाजवा आणि शेअर करा...
धन्यवाद!
Khoop Sundar!
ReplyDelete