अरे
बाप्पा . . . गम मत कर, असं आज मलाच
तुला सांगावंसं
वाटतंय - माणसाला जन्माला घातल्याबद्दल
माणसाने
वाट लावलीये
तुझ्या
पर्यावरणाची,
पश्चात्ताप
करून आता काय उपयोग
की ही
बुद्धी कोणाची?
सृष्टीला साऱ्या रिनोव्हेट करायला
निघालाय हा
दिमाखात
तू
सांभाळलेला तोल त्याने
उधळून
लावलाय शतकांच्या
प्रवासात
प्रदूषणांची
साखळी बघ
कशी मस्त
तयार केलीये
तुझे सारे
ऋतू, दशदिशांचे गार-गरम वारे,
साऱ्याची झकास गोची केलीये
साध्या
साध्या गोष्टींची
व्यवस्थित
गुंतागुंत करून
तुलाच मात
द्यायला निघालाय
तुझ्याकडूनच
ज्ञान मिळवून
रडू नको
बाबा, फक्त चांगल्याची
आशा कर
गम मत कर, बाप्पा, तू आपला गम्मत कर!
माणसाने
उतू नये, मातू नये म्हणून
तू
त्याच्या मागे व्याधी
अन् रोगांचं
शुक्लकाष्ठ
लावलंस, त्यातून बरं व्हायला
त्याने
वैद्यकीय शास्त्र शोधून काढलं...
टेस्ट ट्यूब
बेबी,
हार्ट
ट्रान्सप्लान्ट,लिव्हर
इम्प्लान्ट,
कॉस्मॅटिक
सर्जरी करून
माणूस
चेहरेही बदलू लागला
एकासारखा
दुसरा चेहेरा बनवून
त्याने
क्लोन पण जन्माला घातला
तुझ्या
रिप्लेसमेंटची त्याने सोय करून
ठेवली
आता
त्याला थांबवायची का युक्ती
नाही उरली?
रडू नको
बाप्पा, नाहीतर
नद्यांना
येईल महापूर
मग तर
पृथ्वीचा
विनाश
नाही दूर
अणुबॉम्बचा
शोध लावून
विनाशाची
माणसाने
केलीये
जय्यत तयारी,
स्वस्थ
नाही बसायचं बाप्पा, पुन्हा
बनव तू सृष्टी न्यारी!
अरे यार,जोपर्यंत थोडा अवधी आहे तोवर take a chill pill..
holidays वर जाऊन
जरा खुश कर दिल
गम मत कर, बाप्पा, तू आपला गम्मत कर!!
-- स्मिता शेखर कोरडे
😀👍 मस्स्त !!
ReplyDelete